पहाटे एकट्या प्रवाशांची लूट
By admin | Updated: July 19, 2015 21:34 IST
पोलिसांच्या गस्तीच्या अभावामुळे चोरट्यांचे धाडस वाढले पुणे : पहाटेच्या सुमारास प्रवाशांना दमदाटी करुन लुबाडण्याचे प्रकार सुरुच आहेत. गेल्या रविवारपासून सुरु झालेले लूट सत्र अजून सुरुच आहे. पोलिसांच्या गस्तीच्या अभावामुळे चोरट्यांचे धाडस वाढले असून नागरिकांत घबराट झाली आहे. रात्री साडेबारा ते पहाटे पाच दरम्यान रस्ते निर्मनुष्य असताना बाहेरगावी जाणा-या किंवा पुण्यात ...
पहाटे एकट्या प्रवाशांची लूट
पोलिसांच्या गस्तीच्या अभावामुळे चोरट्यांचे धाडस वाढले पुणे : पहाटेच्या सुमारास प्रवाशांना दमदाटी करुन लुबाडण्याचे प्रकार सुरुच आहेत. गेल्या रविवारपासून सुरु झालेले लूट सत्र अजून सुरुच आहे. पोलिसांच्या गस्तीच्या अभावामुळे चोरट्यांचे धाडस वाढले असून नागरिकांत घबराट झाली आहे. रात्री साडेबारा ते पहाटे पाच दरम्यान रस्ते निर्मनुष्य असताना बाहेरगावी जाणा-या किंवा पुण्यात परतणा-या प्रवाशांना एका टोळक्याने लक्ष्य केल्याचे दिसून येते. एकट्या प्रवाशांना लूटण्याची त्यांची कार्यपध्दती असून पाठलाग करीत, निर्मनुष्य भाग जवळ येताच प्रवाशाला धमकाविले जाते. अशा प्रवाशाच्या बाजुने, मागून मोटरसायकलवर जाऊन त्याचे निरिक्षण केले जाते. अचानक झालेल्या या प्रकारामुळे गांगरुन जात प्रवासी प्रतिकार न करता लुटारुंना शरण जातात. मुंबई बंगलोर हायवेजवळ एकाचे एटीएम कार्ड व मोबाईल पहाटे पाचच्या सुमारास हिसकावून नेण्यात आला. स्वप्नील पाटील (वय २५, मानाजीनगर, न-हे) हायवेजवळच्या सर्व्हिस रस्त्याने जात असताना तिघांनी त्यांना ठार करण्याची धमकी दिली व लूट केली. शनिवारी सिंहगड रस्ता भागात हा प्रकार झाला. बंडगार्डन रोड व कोथरुड अशा दोन भागात चोरांनी आठवड्यापुर्वी अशीच लूट केली. बंडगार्डन रस्त्यावरील सेंट्रल मॉलजवळून पहाटे जाणा-या दुचाकीस्वाराला धमकावून पळवून नेऊन त्याच्याकडील रोकड, मोबाईल व दुचाकी मोटरसायकलवरील दोघांनी पळवून नेली. रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हा प्रकार झाला. कोथरुड बसस्टंॅडजवळून दुचाकीवरुन जाणा-यास पहाटे तीनच्या सुमारास दोघांनी त्यांना अडविले. सोळाशे रुपये, मोबाईल,लॅपटॉप असा ४१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.------------