शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
4
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
5
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
6
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
7
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
8
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
9
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
10
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
11
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
12
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
13
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
14
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
15
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
16
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
17
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
18
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
19
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडीही होत नाही-डब्यालाही नेता येते

Lokmat National Conclave: "काँग्रेसने भारताला घटनात्मकदृष्ट्या अंशत: इस्लामिक देश बनवलं होतं’’, सुधांशू त्रिवेदींचा घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 14:14 IST

Lokmat Parliamentary Awards : आज  दिल्लीमध्ये सुरू असलेल्या लोकमत नॅशनल कॉनक्लेव्हमध्ये सहभागी झालेले भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी यांनी हिंदू धर्म आणि सेक्युलॅरिझरम या विषयांवर आपलं मत मांडताना काँग्रेसवर घणाघाती टीका केली.

आज  दिल्लीमध्ये सुरू असलेल्या लोकमत नॅशनल कॉनक्लेव्हमध्ये सहभागी झालेले भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी यांनी हिंदू धर्म आणि सेक्युलॅरिझरम या विषयांवर आपलं मत मांडताना काँग्रेसवर घणाघाती टीका केली. तसेच काँग्रेसनं देशाला घटनात्मकदृष्ट्या अंशत: इस्लामिक देश बनवून ठेवलं होतं, होतं असा आरोप केला. 

सुधांशू त्रिवेदी यांना हिंदू राष्ट्राच्या कल्पनेबाबत विचारले असता ते म्हणाले की, आमचं सरकार आल्यापासून आम्ही या देशाला खऱ्या अर्थाने सेक्युलर देश बनवण्याचा प्रयत्न केला. याआधी काँग्रेसने आपल्या या देशाला घटनात्मकदृष्ट्या अंशत: इस्लामिक देश बनवून ठेवलं होता. माझ्या  या बोलण्यावर जर कुणाला आक्षेप असेल तर त्यांनी पुरावे आणून द्यावेत. मला जगातील एक सेक्युलर देश दाखवा जिथे शरिया आणि सर्वोच्च न्यायालयात मदभेद झाले तर देशातील सत्ताधारी पक्ष संसदेत कायदा करून घटना बदलून शरियाला सर्वोच्च न्यायालयाला श्रेष्ठ ठरवतो. असा एक सेक्युलर देश दाखवा जिथे ट्रिपल तलाक, हलाला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड असतो, असा सवाल त्यांनी विचारला.

यावेळी सुधांशू त्रिवेदी यांनी कुंभमेळ्याचं उदाहरण देऊन, हिंदू धर्माची सर्वसमावेशकता अधोरेखित केली. ते म्हणाले की, कुंभमेळ्यामध्ये कोट्यवधी लोक सहभागी होतात. त्यात हजारो परकीय पर्यटक येतात. कुठल्या अन्य धर्माच्या कार्यक्रमात इतर धर्माचे लोक जातात का. पण कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या कुणाला हिंदू व्हा, म्हणून सांगितलं जातं का? ही उदारतेची आणि महानतेची सर्वोच्चता आहे, असे ते म्हणाले. 

ते म्हणाले की, भारत हा जगातील असा एकमेव देश आहे जिथे जगातील सर्व धर्म नांदतात. पारशी धर्म त्याच्या उगमस्थानी संपला पण भारतात तो अस्तित्वात आहे. आज या धर्मातील अनेक लोक उद्योगपती आहेत. ज्यू लोकांवर जगात सगळीकडे अत्याचार झाले मात्र भारतात तसं झालं नाही. . इस्लाममध्ये ७२ फिरके आहेत. काही आहेत काही येतील, हे सर्व भारतात आहेत. तरीही या हिंदू संस्कृतीला सांप्रदायिक म्हणून अपमानित केलं जातं, ज्या संस्कृतीमुळे भारतच नाही तर इस्लाममधील बंधुभावही याच संस्कृतीमध्ये आहे. जगात भारत एकमेव देश आहे जिथे २० कोटी मुस्लिम आहेत पण मशिदीत बॉम्बस्फोट होत नाहीत. मात्र जिथे निजाम ए मुस्तफाचं राज्य येतं तिथे मशिदींमध्ये बॉम्बस्फोट होतात. 

टॅग्स :lokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्डBJPभाजपाcongressकाँग्रेस