पंतप्रधान मोदी संसदेत का बोलू शकले नाही? असं आलं भाजपचं उत्तर; मनोज तीवारी स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 20:40 IST2026-02-04T20:39:17+5:302026-02-04T20:40:05+5:30
No PM Modi Speech in Lok Sabha: ...अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी येऊ शकत नव्हते. महिला खासदारांनी तेथून जाण्यास नकार दिला. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलण्यापासून रोखण्यासाठी हे सर्व करत आहेत." देश सर्व बघत आहे आणि काँग्रेसला याचे उत्तरे मागेल."

पंतप्रधान मोदी संसदेत का बोलू शकले नाही? असं आलं भाजपचं उत्तर; मनोज तीवारी स्पष्टच बोलले
आजही प्रचंड गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होऊ शकले नाही. यासंदर्भात बोलताना, "विरोधी पक्षाचे खासदार, जेथे पंतप्रधानांची खुर्ची असते, त्याच्याही काही खुर्च्या वर चढले. विरोधी पक्षाच्या महिला खासदारांनी पंतप्रधानांच्या खुर्चीला घेराव घातला. त्यांच्या मागे पुरुष विरोधी पक्षाचे खासदार होते," असा आरोप भाजप खासदार मनोज तीवारी यांनी केला.
काय म्हणाले, खासदार मनोज तीवारी? -
संसद परिसरात बोलताना भाजप खासदार मनोज तीवारी म्हणाले, "लोकसभेत आज जे घडले त्याचे फोटो बघून आपल्यालाही धक्का बसेल. ही संपूर्ण परिस्थिती काय दर्शवते की, जनता आमचा (काँग्रेसला) हरवत आहे, तर आम्ही आपल्याला बोलू देणार नाही. देशाला एवढा मोठा सन्मान मिळाला आहे, अमेरिकेशी व्यापार करार झाला आहे, मोठ मोठ्या देशांसोबत आपले व्यापार करार होत आहेत. आपण याचे गुण गाण होऊ देणार नाहीच, हे तर आम्हाला माहीतच आहे. पण पंतप्रधानांनाही बोलू देणार नाही आणि त्यासाठी मारहाण आणि अव्यवस्था करण्यापर्यंत पोहोचाल, हे देश बघत आहे आणि देश याचे उत्तर काँग्रेस आणि त्यांच्या सरकाऱ्यांना माघितल्याशिवाय राहणार नाही.
पंतप्रधान मोदी लोकसभेत का बोलू शकले नाही? -
तीवारी म्हणाले, "आमच्या वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी महिला विरोधी पक्षाच्या खासदारांना समजावून सांगितले आणि त्यांना परत जाण्यास सांगितले. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी येऊ शकत नव्हते. महिला खासदारांनी तेथून जाण्यास नकार दिला. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलण्यापासून रोखण्यासाठी हे सर्व करत आहेत." देश सर्व बघत आहे आणि काँग्रेसला याचे उत्तरे मागेल."