शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : उत्तर प्रदेशात भाजपाने दबदबा राखला, 61 जागांवर घेतली आघाडी  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 10:48 PM

भारतीय जनता पक्षासाठी प्रतिष्ठेचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे.

लखनौ - भारतीय जनता पक्षासाठी प्रतिष्ठेचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. एकीकडे सपा-बसपा महाआघाडीची ताकद आणि प्रियंका गांधी यांनी केलेला झंझावाती प्रचार यांचे आव्हान मोडीत काढत भाजपाने 61 जागांवर आघाडी घेतली आहे. उत्तर प्रदेशात भाजपाच्या बहुतांश उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. गुरुवारी रात्री आलेल्या कलांनुसार भाजपा 61, महाआघाडी 18 आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.  दिल्लीच्या सत्तेचा राजमार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते. तब्बल 80 खासदारांचे भरभक्कम संख्याबळ उत्तर प्रदेशातून संसदेत पोहोचत असल्याने प्रत्येक लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचा निकाल निर्णायक ठरत असतो. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून 73 खासदारांचे बळ मिळाल्याने लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळवणे भाजपाला शक्य झाले होते. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा उधळलेला वारू रोखण्यासाठी सपा आणि बसपाने महाआघाडी केली होती. तर काँग्रेसही आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न कर होती. त्यामुळे उत्तर प्रदेशची जनता यावेळी कुणाच्या बाजूने कौल देते याची उत्सुकता सर्वांना लागली होती.  उत्तर प्रदेशमधील निकालांबाबत विविध एक्झिट पोलमधून परस्पर विरोधी दावे करण्यात आले होते. मात्र अखेरीस उत्तर प्रदेशात मोदींचा करिश्मा चालला असून, भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ, गोरखपूर, फूलपूर, गाझियाबाद, सुल्तानपूर, अमेठी, अलाहाबाद, अशा प्रमुख मतदारसंघांमध्ये भाजपाने बाजी मारली आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019BJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीcongressकाँग्रेस