Lok Sabha Election 2019 : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा पराभवाच्या छायेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 03:52 PM2019-05-23T15:52:56+5:302019-05-23T15:53:34+5:30

माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे एचडी देवेगौडा तूमकूर मतदार संघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. तुमकूर मतदार संघातील निकाल अद्याप जाहीर झाला नसून येथे भाजप उमेदवार २१ हजार ७४१ मतांनी आघाडीवर आहे.

Lok Sabha Election 2019: Former Prime Minister HD Deve Gowda in trouble | Lok Sabha Election 2019 : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा पराभवाच्या छायेत

Lok Sabha Election 2019 : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा पराभवाच्या छायेत

Next

मुंबई - लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोल खरे ठरताना दिसत आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत एनडीएला बहुमत दाखवले होते. तर युपीएला ७७ ते १०८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला असून एनडीएला ३४६ च्या जवळपास जागा मिळत असल्याचे चित्र आहे. एक्झिट पोलमध्ये अनेक दिग्गज नेते पराभवाच्या छायेत दाखविण्यात आले होते. यामध्ये माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा देखील समावेश होता. एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरताना दिसून असून देवेगौडा पिछाडीवर आहेत.

माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलरचे एचडी देवेगौडा तूमकूर मतदार संघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. तुमकूर मतदार संघातील निकाल अद्याप जाहीर झाला नसून येथे भाजप उमेदवार १९ हजार ६६९ मतांनी आघाडीवर आहे. तूमकूरमधून देवेगौडा यांच्यासमोर जी.एस. बसवराज यांचे आव्हान होते. 

२०१४ लोकसभा निवडणुकीच्या तुनलेत भारतीय जनता पक्षाला २०१९ मध्ये मोठे यश मिळाले आहे. यावेळी भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकतो.

 

Web Title: Lok Sabha Election 2019: Former Prime Minister HD Deve Gowda in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.