शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

Video: ऐसे पढेगा इंडिया? शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 11:07 AM

देशाच्या 'भविष्या'वर शाळेत जाण्यासाठी जीव मुठीत धरुन प्रवास करण्याची वेळ

खेडा: शिक्षणामुळे भवितव्य घडतं असं म्हणतात. मात्र देशाचं भविष्य असलेल्या मुलांना जीव धोक्यात घालून शाळेत जावं लागत असल्याचा धक्कादायक प्रकार गुजरातमधील खेडा येथे घडत आहे. पूल कोसळून दोन महिने होऊनही प्रशासनाकडून कोणतीही पावलं उचलली जात नसल्यामुळे शाळेत जाण्यासाठी दररोज विद्यार्थ्यांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विद्यार्थी जीव धोक्यात घालून शाळेत जातात आणि शाळेतून घरी परततात. नायका आणि भेराई गावांना जोडणारा पूल कोसळल्यानं विद्यार्थ्यांना दररोज जीवावर उदार होऊन शाळेत जावं लागतं. याबद्दल ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे विनंती- अर्ज केले. मात्र प्रशासनानं त्याकडे लक्ष दिलं नाही. 'हा पूल नसल्यानं आम्हाला 10 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. आधी आम्हाला केवळ 1 किलोमीटर प्रवास करावा लागायचा,' अशी व्यथा एका ग्रामस्थानं एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मांडली. 

या ठिकाणी लवकरच नवा पूल उभारण्यात येईल. त्याचं काम तातडीनं सुरू करण्यात येईल, अशी माहिती खेडाचे जिल्हाधिकारी आय. के. पटेल यांनी दिली. 'पुलाचं काम लवकरच सुरू करण्यात येईल. सध्या पाऊस असल्यानं पुलाचं काम सुरू करण्यात आलेलं नाही,' असं पटेल यांनी सांगितलं. 

टॅग्स :GujaratगुजरातNarendra Modiनरेंद्र मोदीeducationशैक्षणिकStudentविद्यार्थीSchoolशाळाBJPभाजपा