शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

वकिली झग्याचेही झाले भगवेकरण!

By admin | Updated: February 5, 2015 01:30 IST

काही वकील मंडळींनी भगवा झगा घालून चक्क सरन्यायाधीशांच्या न्यायालयात जाण्यापर्यंत मजल मारल्याची बाब समोर आली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यापासून हिंदुत्ववादी शक्तींनी विविध क्षेत्रांत आपला ‘अ‍ॅजेंडा’ पुढे दामटण्याच्या हालचाली चालविल्या असताना काही वकील मंडळींनी भगवा झगा घालून चक्क सरन्यायाधीशांच्या न्यायालयात जाण्यापर्यंत मजल मारल्याची बाब समोर आली आहे.काळा कोट, गळ््याला पांढरा ‘बॅण्ड’ आणि काळा गाऊन असा गणवेश वकिलांसाठी न्यायालयीन कामकाजाच्या वेळी ठररेला आहे. परंतु काही वकील या नेहमीच्या गणवेशावर वरून आणखी भगवा झगा घालून काही महिन्यांपूर्वी सरन्यायाधीशांच्या न्यायालयात शिरले. हे अघटित घडले तेव्हा प्रसिद्धी माध्यमांमधून त्याची वाच्यताही झाली नव्हती. परंतु या प्रकाराची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाने आता असा प्रकार अजिबात खपवून न घेण्याचे खरमरीत परिपत्रक काढल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.सर्व वकिलांनी योग्य गणवेश परिधान करूनच न्यायालयात यावे आणि याचे पालन न करणाऱ्यांना न्यायदालनात तर सोडाच पण न्यायालयाच्या आवारातही प्रवेश दिला जाणार नाही, अशी सक्त ताकीद या परिपत्रकात देण्यात आली आहे. मात्र जे वकील भगवे झगे घालून आले होते त्यांच्यावर त्यावेळी नेमकी काय कारवाई केली, याचा या परिपत्रकात उल्लेख नाही.(विशेष प्रतिनिधी)