मस्ट बातमी

By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:12+5:302014-12-20T22:27:12+5:30

आज शहरात ३२ ठिकाणी होणार पक्षी निरीक्षण

Latest news | मस्ट बातमी

मस्ट बातमी

शहरात ३२ ठिकाणी होणार पक्षी निरीक्षण
नागपूर : द बर्डस् ऑफ विदर्भ या फेसबुकवरील ग्रुपने महाराष्ट्र वन विभाग आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने २१ डिसेंबरला सकाळी ७ ते ११ दरम्यान शहरातील ३२ महत्त्वाच्या पाण्याच्या ठिकाणी पक्षी गणना करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात शहरातील आणि शहराबाहेरील पक्षी निरीक्षक सहभागी होत आहेत. पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांबद्दल मिळालेली माहिती, त्यांची संख्या, त्यांच्या हालचाली महाराष्ट्र वन विभाग आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या नोंदीसाठी देण्यात येणार आहे. पक्षी हे पर्यावरणाचे संकेत देणारे महत्त्वाचे माध्यम असून त्यांच्याबद्दलची ही माहिती पर्यावरणाच्या दृष्टीने मोलाची ठरणार असून स्थलांतरित पक्ष्यांमुळे स्थानिक पक्ष्यांवर त्याचा काय परिणाम होतो ही माहितीसुद्धा उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. पक्षी निरीक्षकांनी भरलेले अर्ज कॅमेरा शॉपी, मोरभवन, झांशी राणी चौक, सीताबर्डी येथे स्वीकारण्यात येतील. (प्रतिनिधी)
..................

Web Title: Latest news