शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर, डॉक्टरांनी तब्येतीबाबत दिली महत्त्वाची माहिती

By बाळकृष्ण परब | Updated: January 21, 2021 22:11 IST

Lalu Yadav Health Update : चारा घोटाळ्याप्रकरणी सध्या कारावासाची शिक्षा भोगत असलेले लालूप्रसाद यादव यांच्यावर रांचीमधील रिम्स रुग्णालयातील पेईंग वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत

रांची - राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली असून, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली आहे. लालूप्रसाद यादव यांच्या छातीत संसर्ग आणि निमोनिया झाल्याचे सांगण्यात येत आहे.चारा घोटाळ्याप्रकरणी सध्या कारावासाची शिक्षा भोगत असलेले लालूप्रसाद यादव यांच्यावर रांचीमधील रिम्स रुग्णालयातील पेईंग वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. तिथेच आज संध्याकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली.दरम्यान, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार लालूप्रसाद यादव यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांना देण्यात आली आहे. लालूंची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच झारखंडचे आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता, रिम्सचे अधीक्षक डॉ. विवेक कश्यप आमि लालूप्रसाद यादव यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर उमेश प्रसाद त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी पेईंग वॉर्डमध्ये पोहोचले.लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीचा माहिती घेतल्यानंतर बन्ना गुप्ता माघारी परतले. तर डॉक्टर लालू यादव यांच्यावर उपचार करत आहेत. लालूंमध्ये निमोनियाची लक्षणे दिसत आहेत. कोरोनाची तपासणी करण्यासाठी त्यांचे नमुने घेण्यात आले असून, लालूंची रॅपिड अँटिजन टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तर आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही. तर एक्स-रे रिपोर्टमध्ये त्यांच्या छातीत किंचीत संसर्ग दिसत आहेत.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलJharkhandझारखंडBiharबिहार