शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
4
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
5
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
6
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
7
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
8
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
9
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
10
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
11
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
12
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
13
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
14
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
15
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
16
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
17
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
18
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
19
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
20
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
Daily Top 2Weekly Top 5

Lakhimpur Kheri Violence: कायदेमंत्र्यांची घोषणा, हिंसाचारात ठार झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना शहीदाचा दर्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 12:00 IST

Lakhimpur Kheri Violence: उत्तर प्रदेशचे कायदा मंत्री ब्रिजेश पाठक यांनी हिंसाचारात मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्ते शुभम मिश्रा आणि हरी ओम मिश्रा यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

लखीमपूर खेरी:उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांसह भाजप कार्यकर्त्यांचाही मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशचे कायदामंत्री ब्रजेश पाठक यांनी बुधवारी मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्यांपैकी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या वाहनाचे चालक हरी ओम मिश्रा आणि भाजपचे विभागीय मंत्री शुभम मिश्रा यांच्या कुटुंबाची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी कुटुंबियांना न्याय देण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, ब्रजेश पाठक लखीमपूरच्या हिंसाचारात ठार झालेल्या जिल्ह्यातील इतर 4 जणांच्या नातेवाईकांना भेटले नाहीत. त्यात भाजपचे कार्यकर्ते श्याम सुंदर निषाद आणि पत्रकार रमण कश्यप याशिवाय नचतार सिंग आणि लव्हप्रीत सिंग या दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे. या घटनेत ठार झालेले अन्य दोन शेतकरी गुरविंदर सिंग आणि दिलजीत सिंग हे बहराइच जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

भाजपमध्ये शहीदचा दर्जाब्रजेश पाठक म्हणाले की, शुभम मिश्रा उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना घेण्यासाठी जात होते. पण, त्यापूर्वीच हिंसाचारात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, ब्रजेश पाठक यांनी मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना पक्षात शहीदचा दर्जा मिळेल असे सांगितले आहे. तसेच, प्रकरणाची कारवाई होत असून, दोषींची गय केली जाणार नाही, त्यांना लवकरच अटक होईल, असे आश्वासन पीडितांच्या कुटुंबियांना दिले.

परिस्थिती सामान्य झाल्यावर इतरांना भेटणारयावेळी माध्यमांनी ब्रजेश यांना इतर पीडितांच्या कुटुंबियांना भेटण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, भाजप कार्यकर्ते श्याम सुंदर निषाद आणि पत्रकार रमण कश्यप यांच्या नातेवाईकांची भेट घेणार आहे. पण, त्यांची घरे घटनास्थळाच्या जवळच असल्यामुळे परिस्थिती सामान्य झाल्यावर त्यांची भेट घेईल.  

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा