शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लादेन, वनी, हाफिज सईदच्या पंक्तीत केजरीवाल? सुरतमध्ये झळकली पोस्टर्स

By admin | Updated: October 14, 2016 12:11 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 'पाकिस्तानचा हिरो' असा उल्लेख असलेले पोस्टर सुरतमध्ये लावण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत

सुरत, दि. 14 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा 'पाकिस्तानचा हिरो' असा उल्लेख असलेले पोस्टर सुरतमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले होते. विशेष म्हणजे, या पोस्टरमध्ये काश्मीरमध्ये मारला गेलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहानी वनी, जैश-ए-मुहम्मदचा प्रमुख  हाफिज सईद आणि  ओसामा बिन लादेन यांचा समावेश आहे. या तिघांच्या पंक्तीत केजरीवाल यांना स्थान देण्यात आले आहे.
 
16 ऑक्टोबर रोजी अरविंद केजरीवाल यांची सुरतमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे ही सभा होऊ न देण्याच्या उद्देशाने भाजपानेच हे पोस्टर लावले, असा आरोप सुरतमधील 'आप'चे प्रवक्ते योगेश जादवानी यांनी केला आहे. मात्र भाजपाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, केजरीवाल यांचे आक्षेपार्ह पोस्टर लावल्याची माहिती मिळताच 'आप'ने हे पोस्टर काढले. शहरातील आठ बॅनर्स काढण्यात आल्याचे जादवानी यांनी सांगितले. 
 
16 ऑक्टोबर रोजी केजरीवाल शहरातील योगी चौकात जाहीर सभा घेणार आहेत. या सभेला जवळपास 1 लाख लोक उपस्थित राहतील, असा अंदाज जादवानी यांनी व्यक्त केला आहे. केजरीवाल यांच्यासोबत आपचे नेेते कुमार विश्वास आणि संजय सिंहदेखील असणार आहेत. या सभेनंतर केजरीवाल अहमदाबाद आणि सुरतमधील संयोजकांना भेटणार आहेत. तर दुस-या दिवशी ते विविध संघटनांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. 
 
दरम्यान,  सुरतचे भाजपाचे शहराध्यक्ष नितीन भाजियावाला यांनी, पक्षातील कार्यकर्त्यांना केजरीवाल यांच्या सभेला विरोध न करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले आहे. तसेच केजरीवाल यांचे आक्षेपार्ह फोटो भाजपा कार्यकर्त्यांनी लावल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी आप असे डाव आखत असून दुसरीकडे भाजपाला बदनाम करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.