शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

Ladakh Standoff: लडाखमधील कुरापती चीनला महागात; कडाक्याच्या थंडीमुळे सैनिकांचे जीव संकटात

By कुणाल गवाणकर | Updated: October 15, 2020 15:50 IST

Ladakh Standoff: लडाखमधील वातावरण चिनी सैनिकांना झेपेना; तापमान कमी झाल्यानं हाल

बीजिंग: गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनमधील तणाव वाढला आहे. या दरम्यान चिनी सैन्यानं पूर्व लडाखमध्ये काही वेळा घुसखोरीचे प्रयत्न केले. मात्र ते भारतीय जवानांनी हाणून पाडले. मात्र तरीही चीनच्या कुरापती सुरूच आहेत. त्यासाठी चीननं सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं आहे. मात्र पूर्व लडाखमध्ये कडाक्याचा हिवाळा चिनी सैनिकांसाठी जीवघेणा ठरत आहे.पँगाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर तैनात असलेल्या चिनी सैन्याच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्याच आठवड्यात या भागातून एका सैनिकाची प्रकृती बिघडल्यानं त्याला वैद्यकीय उपचारांसाठी हेलिकॉप्टरनं नेण्यात आलं. या भागात रात्री पारा वेगानं घसरतो. त्यामुळे चिनी सैनिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. थंडी वाढल्यानं अनेक चिनी सैनिकांची प्रकृती बिघडली आहे.पँगाँग सरोवराला लागून असलेल्या १५ ते १६ हजार फूट उंच डोंगरांवर ५ हजार चिनी सैनिक तैनात आहेत. थंडीचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक बंकर तयार करण्यात आल्याचा दावा याआधी चीननं केला होता. या बंकरमधील तापमान कमी असेल, असं चीनकडून सांगण्यात आलं होतं. मात्र सध्याची परिस्थिती चीनचे दावे फोल ठरताना दिसत आहेत.चिनी सैन्य युद्धजन्य परिस्थितीप्रमाणे काम करत असल्याचं तिथल्या सरकारी माध्यमांनी म्हटलं होतं. अस्थायी बंकरच्या जागी नवीन आणि स्थायी बंकर उभारले जात असल्याचं वृत्त सरकारी वृत्तवाहिनी सीसीटीव्हीनं दिलं होतं. मात्र या बंकरची उभारणी कधी सुरू केली आणि त्यांच्या बांधकामासाठी किती वेळ लागला, याची कोणतीही माहिती सीसीटीव्हीनं दिली नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं सैन्यासाठी सुविधा निर्माण केला जात असल्याचं सीसीटीव्हीनं म्हटलं होतं. 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाख