शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक न लढणाऱ्या पक्षांवर कोसळणार कुऱ्हाड

By admin | Updated: March 21, 2015 23:51 IST

मागील ५ ते १० वर्षात एकही निवडणूक न लढणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार आहे. त्यामुळे अशा राजकीय पक्षांवर निकट भविष्यात कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.

कोलकाता : मागील ५ ते १० वर्षात एकही निवडणूक न लढणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निवडणूक आयोगाचा विचार आहे. त्यामुळे अशा राजकीय पक्षांवर निकट भविष्यात कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.मुख्य निवडणूक आयुक्त एच.एस. ब्रह्मा यांनी शनिवारी येथे असे संकेत दिले. देशभरात एकूण १,६०० च्या वर नोंदणीकृत राजकीय पक्ष असून त्यापैकी २०० पेक्षाही कमी पक्ष निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, अशी माहितीही त्यांनी दिली. नॅशनल इलेक्शन वॉचच्या एका संमेलनात मार्गदर्शन करताना ब्रह्मा म्हणाले की, एखादा पक्ष पाच वर्षे, सात वर्षे किंवा १० वर्षे कुठल्याही निवडणुकीत सहभागी होत नसेल तर त्याची नोंदणी आपोआपच रद्द झाली पाहिजे याबाबत आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत. याशिवाय किमान दोन ते तीन विधानसभा आणि एक लोकसभेची निवडणूक न लढविलेल्या पक्षांविरुद्ध काही ठोस कारवाई करण्याच्या दृष्टीनेही विचार सुरू आहे.आम्ही याची अंमलबजावणी करू शकत नाही. परंतु लोकांकडून त्यांच्यावर (लोकप्रतिनिधी) दबाव आल्यास राजकारणाशिवाय इतर स्वार्थसिद्धींसाठी होणाऱ्या राजकीय पक्षांच्या बोगस नोंदणींवर आळा घालता येणे शक्य आहे, असेही निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. नोंदणीकृत राजकीय पक्षांना राज्य सरकारकडून प्राप्ती करात सवलतींसह अनेक फायदे मिळत असतात. (वृत्तसंस्था)बनावट मतदार नसलेला पहिला देशबायोमेट्रिक डाटा असलेला जगातील पहिला देश म्हणून भारत ओळखला जाणार असून नागरिकाचे मतदान ओळख पत्र त्याच्या आधार कार्डशी जोडल्यानंतर मतदार यादीत कुठलीही बनावट नावे समाविष्ट होणार नाहीत, असा विश्वास ब्रह्मा यांनी व्यक्त केला. एपिक कार्डवर आधारक्रमांक टाकण्यात आम्हाला यश येईल त्यावेळी एकही बनावट क्रमांक असणार नाही. २०१५ सालातच हे काम पूर्णत्वास येणार असून त्यानंतर भारत जगभरात मतदारांसाठी बायोमेट्रिक व्यवस्था असलेला एकमेव देश असेल.