शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कोदामेंढी....

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

तलाठी गैरहजर, शेतकरी त्रस्त

तलाठी गैरहजर, शेतकरी त्रस्त
कोदामेंढी येथील प्रकार : कारवाईची मागणी
कोदामेंढी : तलाठी मुख्यालयी गैरहजर राहत असल्याने शेतकऱ्यांची अनेक महत्त्वपूर्ण कामे रखडली आहेत. तलाठ्याच्या गैरहजरपणामुळे शेतकरी कमालीचे त्रस्त असून अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.
मंगळवारी स्थानिक तलाठी कार्यालयात परिसरातील अनेक गावांचे शेतकरी तलाठी सोनटक्के यांची प्रतीक्षा करीत होते. काहींनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता, त्यांनी लवकर पोहोचतो असे सांगितले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत वाट पाहून तलाठी न आल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. याबाबत कोतवाल देवानंद मेश्राम यांना विचारणा केली असता, मंगळवारी तलाठी शेतकऱ्यांच्या अनुदान याद्या तयार करण्यासाठी मौदा तहसील कार्यालयात असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे तलाठी गैरहजर असल्याचा प्रकार येथे सतत बघावयास मिळतो. तलाठ्याचे मुख्यालय येथे असताना ते मुख्यालयी राहत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे.
या संदर्भात तहसीलदार पडोळे यांच्याशी सपंर्क साधला असता, सदर तलाठ्यास मी मंगळवारी बोलाविले नसल्याचे त्यांनी सांगितले. तलाठी सोनटक्के यांना मुख्यालयी राहून नागरिकांची कामे वेळीच करण्याची निर्देश दिले आहेत. परंतु नागरिकांना नाहक त्रास दिला जात असेल तर कारवाई करू असेही पडोळे यांनी स्पष्ट केले.
कोदामेंढी, अरोली, बेरडेपार, अडेगाव, तांडा, धर्मापुरी, खरडा, नांदगाव, धानोली, इंदोरा, वाकेश्वर, सिरसोली, वायगाव, सुकळी, तोंडली, वाघबोडी, बोरी, खंडाळा, राजोली, रेवराळ, नवरगाव, श्रीखंडा, मोरगाव, खात, महालगाव, पिंपळगाव, खिडकी व परिसरातील गावे मौदा तहसील कार्यालयापासून २५ किमी अंतरावर आहेत. यातील अनेक गावातील तलाठी जनतेची दिशाभूल करतात. तहसील कार्यालयात काम होते, असे कारण पुढे करून मुख्यालयी राहत नाहीत.
परिसरातील गावांच्या तलाठ्यांना तहसील कार्यालयात वारंवार न बोलविता मंडळ कार्यालयात तहसीलदारांनी बैठक घेऊन स्थानिक पातळीवर शासनाच्या योजना व कामांचे नियोजन करण्याची नितांत गरज आहे. तसेच कामचुकार अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)