शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

किरण बेदींच्या प्रवेशामुळे भाजपात दरार ?

By admin | Updated: January 19, 2015 15:42 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किरण बेदींना प्रवेश देऊन दिल्ली प्रदेश भाजपाला बळकट करण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींनी केला असला तरी प्रत्यक्षात बेदींमुळे पक्षांतर्गत खदखद सुरु झाली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किरण बेदींना प्रवेश देऊन दिल्ली प्रदेश भाजपाला बळकट करण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठींनी केला असला तरी प्रत्यक्षात बेदींमुळे पक्षांतर्गत खदखद सुरु झाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असलेले भाजपा नेते जगदीश मुखी यांनी किरण बेदींच्या प्रवेशाविषयी पक्ष नेतृत्वाने माझ्याशी चर्चा केली नव्हती असे सांगत पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आणले आहेत.
गेल्या आठवड्यात माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी पक्षाध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. बेदी यांच्या प्रवेशामुळे भाजपाला केजरीवालांना सामोरे जाण्यासाठी एक सक्षम चेहरा मिळाला आहे. बेदी या भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील अशी चर्चाही दिल्लीतील राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र प्रत्यक्षात बेदींमुळे दिल्ली भाजपातील ज्येष्ठ नेते नाराज आहेत. जगदीश मुखी यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना त्यांची नाराजी व्यक्त केली. 'बेदीना प्रवेश देताना प्रदेश कार्यकारिणीशी फारशी चर्चा झाली नाही बहुधा केंद्रातील वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा झाली असेल असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. तर दिल्लीतील भाजपा खासदार आणि अभिनेते मनोज तिवारी यांनीही बेदी यांना मुख्यमंत्रीपद देण्यास विरोध केला आहे. केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धनही किरण यांच्या प्रवेशामुळे नाराज असल्याचे समजते.