शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

खोतकर व सांबरे यांना हिरवा कंदील !

By admin | Updated: September 18, 2014 00:39 IST

जालना : माजीमंत्री अर्जुन खोतकर व आ. संतोष सांबरे या दोघा मातब्बर पुढाऱ्यांच्या उमेदवारीवर शिवसेना पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

जालना : माजीमंत्री अर्जुन खोतकर व आ. संतोष सांबरे या दोघा मातब्बर पुढाऱ्यांच्या उमेदवारीवर शिवसेना पक्षश्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. या जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातील दोन डझन इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले होते. त्या सर्व इच्छुकांना शिवसेना पक्षश्रेष्ठींनी मंगळवारी मुंबईत मुलाखतींसाठी पाचारण केले. परंतु अर्ज दाखल केलेल्यांपैकी काही जणांनी ऐनवेळी माघार घेतली. ते ‘मातोश्री’कडे फिरकले सुद्धा नाहीत. मात्र अन्य इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह पक्षश्रेष्ठींसमोर उमेदवारीसाठी भक्कम दावे दाखल केले. माजी मंत्री अर्जुन खोतकर व शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर या दोघांनी जालन्यातून उमेदवारीसाठी दावा केला होता. या दोघांबरोबरही श्रेष्ठींनी मंगळवारी व बुधवारी तपशीलवार चर्चा केली. त्यातून अखेर खोतकर यांच्या उमेदवारीस श्रेष्ठींनी हिरवा कंदील दिल्याची माहिती हाती आली आहे. विद्यमान आमदार संतोष सांबरे यांनी यापूर्वीच बदनापुरातून पुन्हा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे सांबरे यांनी श्रेष्ठींसमोर दावा केला. त्यांच्याबरोबर शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भास्कर मगरे यांनीही उत्सुकता दर्शविली होती. परंतु श्रेष्ठींनी या दोघांबरोबरही चर्चा करीत आ. सांबरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती हाती आली आहे. घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून तब्बल सतरा इच्छुकांनी उमेदवारीसाठी दावा दाखल केला होता. त्यापैकी तेरा इच्छुकांनी मंगळवारी ‘मातोश्री’ वर हजेरी लावली. श्रेष्ठींसमोर उमेदवारीबाबत भक्कम दावा केला. माजी आमदार शिवाजीराव चोथे या प्रमुख दावेदारांबरोबर उपजिल्हाप्रमुख पंडितराव भुतेकर, युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य जगन्नाथ काकडे, बाबासाहेब इंगळे, भाऊसाहेब पाऊलबुधे, सतीश घाटगे, रवींद्र आर्दड, माजी सभापती चिंचाणे यांनीही मुलाखती दिल्या. माजी आमदार विलासबापू खरात व हिकमतराव उढाण या दोघांनीही ‘मातोश्री’ वर श्रेष्ठींच्या भेटी घेतल्या. उमेदवारीविषयी उत्सुकता दर्शविली. (प्रतिनिधी)घनसावंगी मतदारसंघातून तब्बल तेरा इच्छुकांनी उमेदवारीसाठी उत्सुकता दर्शविल्याने पक्षश्रेष्ठी बुचकाळ्यात पडली आहे. एकत्र या, विचार करा आणि तुमच्यापैकी एकाची शिफारस करा, असा सल्ला पक्षश्रेष्ठींनी या इच्छुकांना दिला होता. परंतु या इच्छुकांत एकमत न घडल्याने सर्वांनी श्रेष्ठींनाच तुम्ही द्याल, तो आदेश शिरसावंद्द राहिल, असा शब्द देऊन श्रेष्ठींसमोर पेच उभा केला असल्याचे वृत्त हाती आले आहे.