केरळमध्ये पावसाचा हाहाकार, एका क्षणात अख्ख घर नदीच्या पाण्यात गेलं वाहून; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 09:03 AM2021-10-18T09:03:38+5:302021-10-18T09:03:43+5:30

Kerala Rain: केरळमध्ये पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

Kerala rain news, in an instant the whole house swept away in the river water; WATCH VIDEO | केरळमध्ये पावसाचा हाहाकार, एका क्षणात अख्ख घर नदीच्या पाण्यात गेलं वाहून; पाहा VIDEO

केरळमध्ये पावसाचा हाहाकार, एका क्षणात अख्ख घर नदीच्या पाण्यात गेलं वाहून; पाहा VIDEO

googlenewsNext

तिरुअनंतपुरम: सध्या केरळ(Kerala) राज्यात पावसाने थैमान घातले आहे. केरळच्या काही भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे(Heavy Raining in Kerala) विविध घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, केरळच्या विविध भागातून पावसाशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही येत आहेत. असाच एक व्हिडिओ कोट्टायमच्या मुंडकायममधून समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे नदीने रौद्र रुप धारण केलंय. या पाण्याच्या वेगामुळे रस्त्याच्या कडेला बांधलेलं एक पक्कं घर सुरुवातीला थोडं वाकतं आणि नंतर अख्ख घर नदीत वाहून जातं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घर नदीन कोसळलं तेव्हा घरात कुणीच नव्हतं.

कोट्टायममध्ये कुटुंबातील सर्वांचा मृत्यू
दरम्यान, केरळमधील पावसामुळे कोट्टायम जिल्ह्यात 40 वर्षीय व्यक्ती, त्याची 75 वर्षीय आई, 35 वर्षीय पत्नी आणि 14, 12 आणि 10 वर्षांच्या तीन मुलींसह कुटुंबातील सहा सदस्यांचा कोट्टायममधील कुट्टिक्कल येथे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घढली आहे.  भूस्खलनामध्ये या कुटुंबाचे घर वाहून गेले. शनिवारी तीन जणांचे मृतदेह सापडले, इतरांचा शोध सुरू आहे.

मोदींची केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
दुसरीकडे, केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी रविवारी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन(Pinarayi Vijayan) यांच्याशी परिस्थितीबाबत चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी ट्विट केलं, 'केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी बोललो आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीवर चर्चा केली. जखमी आणि बाधितांना मदत करण्यासाठी अधिकारी कार्यरत आहेत.

Read in English

Web Title: Kerala rain news, in an instant the whole house swept away in the river water; WATCH VIDEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.