शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत आता शाजिया इल्मी विरुद्ध केजरीवाल सामना

By admin | Updated: November 8, 2014 03:47 IST

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा हे जानेवारी-फेब्रुवारीत होऊ घातलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील आपल्या ‘मिशन ५०’ वर आता शेवटचा हात फिरवीत आहेत

हरीश गुप्ता, नवी दिल्लीभाजपाचे अध्यक्ष अमित शहा हे जानेवारी-फेब्रुवारीत होऊ घातलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील आपल्या ‘मिशन ५०’ वर आता शेवटचा हात फिरवीत आहेत. नवी विधानसभा १७ फेब्रुवारीपर्यंत स्थापन होणार आहे आणि यावेळी कोणतीही चूक न करता ५० पेक्षा जागा मिळविण्याचे लक्ष्य भाजपाने निर्धारित केले आहे.उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या कोणत्याही खासदाराला तिकीट न देण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, मीनाक्षी लेखी, दिवंगत साहिबसिंग वर्मा यांचे चिरंजीव परवेश वर्मा आणि राज्यसभा सदस्य विजय गोयल या नेत्यांनी राज्याच्या राजकारणात परतण्याची आपली इच्छा याआधीच जाहीर केलेली होती. परंतु आपापल्या लोकसभा मतदारसंघावरच लक्ष केंद्रित करण्याचे आणि पक्षाचे तिकीट मिळालेल्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे या नेत्यांना सांगण्यात आले आहे.आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून यावेळी विजेंद्र गुप्ता यांच्याऐवजी आपच्या माजी नेत्या शाजिया इल्मी यांना भाजपाची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे, असे या सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने केजरीवाल यांच्या विरुद्ध विजेंद्र गुप्ता यांना मैदानात उतरविले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपच्या उमेदवार राहिलेल्या शाजिया इल्मी केवळ ३०० मतांनी पराभूत झाल्या होत्या. केजरीवाल यांना टक्कर देऊ शकेल, असा एकही उमेदवार सध्या तरी भाजपाजवळ नाही. किरण बेदी यांनी केजरीवालांविरुद्ध लढण्यास आधीच नकार दिलेला आहे.आपण शाजिया इल्मी यांच्या बाजूने प्रचार करू, असे कुमार विश्वास यांनी भाजपा नेत्यांना कळविल्याचे वृत्त आहे. आपचे किमान अर्धा डझन आमदार तिकीट मिळण्यासाठी भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याचे कळते. भाजपाने दिल्लीतील लोकसभेच्या सर्व जागा जिंकल्या असल्या तरी मागील १५ वर्षांपासून पक्ष विधानसभा निवडणुकीत मात्र सतत पराभूत होत आला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने दिल्लीतील ७० विधानसभा मतदारसंघांपैकी ६० विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली होती. ही आघाडी आणि सध्या देशात दिसत असलेली मोदी लाट यावर स्वार होऊन यावेळी आपले ‘मिशन ५०’ यशस्वी होणारच, असा विश्वास भाजपाला वाटत आहे.