शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
4
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
5
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
6
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
7
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
8
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
9
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
10
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
11
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
12
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
13
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
14
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
17
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
18
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
19
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
20
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवाल आणखी १४ दिवस तुरुंगातच

By admin | Updated: May 23, 2014 14:18 IST

भाजप नेते नितीन गडकरी यांची बदनामी केल्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी जातमुचलक्याची रक्कम भरण्यास नकार दिल्याने दिल्ली कोर्टाने त्यांना आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २३ - भाजप नेते नितीन गडकरी यांची बदनामी केल्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी जातमुचलक्याची रक्कम भरण्यास नकार दिल्याने दिल्ली कोर्टाने त्यांना आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता केजरीवाल यांना ६ जूनपर्यंत तिहार तुरुंगात काढावी लागणार आहेत. 

नितीन गडकरींची बदनामी केल्याप्रकरणी शुक्रवारी दिल्ली न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीसाठी केजरीवाल यांना कोर्टासमोर हजर करण्यात आले. शुक्रवारीही केजरीवाल यांनी १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र केजरीवाल यांनी पुन्हा एकदा ही रक्कम भरण्यास नकार देत जामीन नाकारला. अखेरीस कोर्टाने केजरीवाल यांना १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, आपचे नेते सोमनाथ भारती यांनी केंद्रात भाजपची सत्ता आल्यानेच केजरीवाल यांना तब्बल १४ दिवसांसाठी कोठडीत ठेवण्यात आले आहे. हा प्रकार म्हणजे मूलभूत हक्कांची गळचेपी असल्याचे भारती यांनी सांगितले. चोराला चोर म्हणून आम्ही काहीही चूक केली नाही असे सोमनाथ भारतींनी सांगितले. 
काय आहे प्रकरण?
गत जानेवारी महिन्यात केजरीवाल यांनी देशातील सर्वाधिक भ्रष्ट लोकांची यादी जाहीर केली होती. या यादीत भाजपा नेते गडकरी यांचे नाव होते. याविरुद्ध गडकरींनी केजरीवाल यांच्याविरोधात दिल्ली न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली होती. केजरीवालांच्या आरोपांमुळे आपली प्रतिमा मलिन झाल्याचा दावा गडकरींनी यात केला होता.