शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी कासिम ठार!

By admin | Updated: October 30, 2015 01:39 IST

उधमपूर दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लष्कर-ए-तय्यबाचा वरिष्ठ कमांडर अबू कासिम याचा गुरुवारी सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथील चकमकीत खात्मा केला.

श्रीनगर : उधमपूर दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लष्कर-ए-तय्यबाचा वरिष्ठ कमांडर अबू कासिम याचा गुरुवारी सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथील चकमकीत खात्मा केला. दोन महिन्यांपूर्वीच्या उधमपूर हल्ल्यासह काश्मीर खोऱ्यात गेल्या तीन वर्षांत झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांत कासिमचा हात होता. कासिमला कंठस्नान घातल्याने काश्मिरातील लष्कर-ए-तय्यबाच्या कारवायांना पायबंद आणि विविध दहशतवादी संघटनांना हादरा बसणार आहे. परिणामी, सुरक्षा दलाचे हे मोठे यश मानले जात आहे.पाकिस्तानच्या बहावलपूरचा रहिवासी कासिम (२८) आणि त्याचे सहकारी श्रीनगरपासून ८० किमी अंतरावरील कुलगामच्या खांदीपुरा गावातील एका घरात दडून बसले असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर रात्री २ वाजता शोधमोहीम सुरू करण्यात आली. लष्कर, पोलीस आणि निमलष्करी दलाच्या संयुक्त पथकाने गावाला वेढा घातला. कासिम व त्याच्या साथीदारांनी सुरक्षा दलाच्या वेढ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. या वेळी उडालेल्या चकमकीत कासिम ठार झाला. त्याचे इतर सहकारी मात्र लपून बसले असून मोहीम अजूनही सुरू आहे. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक एस. जे. एम. गिलानी यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, कासिमच्या खात्म्याने सुरक्षा दलाला फार मोठे यश मिळाले आहे. कोण आहे कासिम?कासिमचे खरे नाव अब्दुल रहमान. तो या वर्षी ५ आॅगस्ट रोजी उधमपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या पथकावर (बीएसएफ) झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार होता.कासिम हा वाँटेड दहशतवाद्यांपैकी असून, पोलिसांनी त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. उधमपूर हल्ल्याचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेनेही (एनआयए) त्याची माहिती देणाऱ्यास एवढ्याच रकमेच्या पुरस्काराची घोषणा केली होती.७ आॅक्टोबर २०१५ला बांदीपुरात उपनिरीक्षक मोहम्मद अल्ताफ डार यांच्या हत्याकांडामागेही तोच होता.महानिरीक्षक गिलानी यांनी सांगितले की, २०१३ साली हैदरपुरामध्ये कासिमच्याच नेतृत्वात लष्कराच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. यात ८ जवान शहीद झाले होते. कासिमचा खात्मा झाला असल्याने उधमपूर हल्ल्याचा तपास बंद करणार काय, असे विचारले असता या प्रकरणाचा तपास एनआयए करीत असल्याचे ते म्हणाले.