शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर क्रिकेट असोसिएशन घोटाळा, फारुक अब्दुल्लांची ईडीकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 07:02 IST

फारुक अब्दुल्ला यांचे पुत्र व माजी केंद्रीय मंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर राज्याला पूर्वीप्रमाणेच विशेष दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी सहा पक्षांनी आघाडी स्थापन केली आहे.

नवी दिल्ली :जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख डॉ. फारुक अब्दुल्ला यांची श्रीनगर येथे चौकशी केली. त्याबद्दल नॅशनल कॉन्फरन्सने निषेध नोंदविला आहे.

फारुक अब्दुल्ला यांचे पुत्र व माजी केंद्रीय मंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीर राज्याला पूर्वीप्रमाणेच विशेष दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी सहा पक्षांनी आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळेच राजकीय सूडबुद्धीने फारुक अब्दुल्ला यांची ईडीमार्फत चौकशी करण्यात आली. ईडीने फारुक अब्दुल्ला यांच्या निवासस्थानावर छापे न घालता त्यांना फक्त चौकशीसाठी बोलाविले. यातही धूर्त खेळी आहे. आपल्यावर कोणीही दोषारोप करणार नाही याची चौकशी करणाऱ्यांनी काळजी घेतली आहे.

जम्मू-काश्मीरचा रद्द केलेला दर्जा पुन्हा बहाल करण्यात यावा यासाठी सहा पक्षांनी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय झाला, ती बैठक फारुक अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी झाली होती. त्या बैठकीला पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती, पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन, पीपल्स मूव्हमेंटचे नेते जावेद मीर, सीपीआय (एम)चे नेते मोहम्मद युसूफ तारिगामी, अवामी नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष मुजफ्फर शाह उपस्थित होते.

४३.६९ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप2005-2012 या कालावधीत जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन या संस्थेमध्ये 43.69 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी फारुक अब्दुल्लांसह दहा पदाधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. क्रीडा संघटनेचे कर्ज देणाºया संस्थेत रूपांतर केल्याचा तसेच अनेक बनावट खाती उघडून हे व्यवहार झाल्याचा आरोप आहे. 

टॅग्स :Farooq Abdullahफारुख अब्दुल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय