कर्नाटकातील अलमट्टी धरण ९८ टक्के भरले; ४२ हजार ५०० क्युसेकचा विसर्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 13:14 IST2025-08-09T13:13:32+5:302025-08-09T13:14:10+5:30

पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली तर धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवणे कठीण होणार

Karnataka's Almatti dam 98 percent full If heavy rains occur in western Maharashtra, it will be difficult to control water storage | कर्नाटकातील अलमट्टी धरण ९८ टक्के भरले; ४२ हजार ५०० क्युसेकचा विसर्ग सुरु

संग्रहित छाया

सांगली : अलमट्टी धरणाची १२३ टीएमसीची क्षमता असून शुक्रवारी धरणात १२०.९२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण जवळपास ९८ टक्के भरल्यामुळे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने ४२ हजार ५०० क्युसेक विसर्ग चालू केला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्यास कर्नाटक पाटबंधारे विभागाचे अलमट्टी धरणातील पाणी सोडण्याचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पण, अलमट्टी धरणात ४५ हजार ४५५ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरण ९८ टक्के भरले आहे. कोणत्याही क्षणी धरण १०० टक्के भरू शकते, अशी परिस्थिती आहे.

यातच भविष्यात पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी लावली तर धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवणे कठीण होणार आहे. तसेच अलमट्टी धरणाच्या खालील कर्नाटकामधील गावांना पुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच अलमट्टी धरण व्यवस्थापनाने धरणातील विसर्ग ४२ हजार ५०० क्युसेक विसर्ग सुरू केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील धरणातील पाणीसाठा

धरण - आजचा साठा - क्षमता

  • कोयना - १००.१३ - १०५.२५
  • धोम - १२.६४ - १३.५०
  • कन्हेर - ९.४४ - १०.१०
  • वारणा - २८.९३ - ३४.४०
  • दूधगंगा - २०.५१ - २५.४०
  • राधानगरी - ८.०१ - ८.३६
  • तुळशी - ३.३६ - ३.४७
  • धोम-बलकवडी - ३.७९ - ४.०८
  • उरमोडी - ९.४४ - ९.९७
  • तारळी - ५.१७ - ५.८५
  • अलमट्टी - १२०.९२ - १२३

Web Title: Karnataka's Almatti dam 98 percent full If heavy rains occur in western Maharashtra, it will be difficult to control water storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.