हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभेची भाजपा खासदार कंगना राणौतने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 'टपोरी' म्हटलं आहे. तिच्या या विधानावर चहुबाजूंनी टीका होत आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी यावरून कंगनावर जोरदार निशाणा साधला. "कंगना राणौत ही स्मृती इराणींची रिक्त जागा भरण्याचा प्रयत्न करत आहे. स्मृती इराणींनाही खूप अहंकार होता, पण 'सास भी कभी बहू' प्रमाणे त्या गायब झाल्या. आज त्यांचा पत्ता नाही."
"कंगना राणौतची अवस्थाही तशीच होईल, जी स्मृती इराणींची झाली. जशा स्मृती इराणी राजकारणातून गायब झाल्या, तसंच कंगनाचं काय झालं हे कुणालाही कळणार नाही. राजकारणात शब्दांच्या नीच पातळीपर्यंत जात आहेत. हिमाचलमधील एका आमदारावर अल्पवयीन मुलावर बलात्कार केल्याप्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे, आरोपपत्र दाखल झालं आहे आणि त्याला न्यायालयात हजर व्हायचं आहे. हा भाजपाचा आमदार आहे" असं म्हणत अलका लांबा यांनी टीकास्त्र सोडलं.
"कंगनाला विचारा की ती या यावर बोलेल का? कुलदीप सिंह सेंगरवर बोलली का? ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले, तेव्हा तू बोललीस का? पॅरोलवर अनेक बलात्कारी बाहेर येत आहेत, त्यावर बोललीस का? तू अजिबात बोलणार नाहीस, कारण तुम्ही त्यांच्यासोबत उभे आहात. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान महिला त्यांना किती आपुलकीने भेटत होत्या. महिला भावूक होत होत्या, त्यांना मिठी मारत होत्या."
"बॉलिवूडला लगाम लावण्याची वेळ आलीय"; नोराच्या 'सरके चुनर' गाण्यावर कंगना राणौतचा संताप
"एक काळ असा होता जेव्हा तुला नशेचं वाईट व्यसन होतं. तू नशेच्या आहारी होतीस आणि त्या नशेचा परिणाम अनेक वर्षांनंतरही अजून गेलेला नाही असं वाटतं. त्या नशेचा जो परिणाम आहे, तो आजही दिसतो कारण तू मुद्द्यांवर बोलत नाही. मला तुझ्या प्रकृतीची चिंता वाटते. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करेन की, राष्ट्रीय स्तरावर तातडीने 'राष्ट्रीय नशा मुक्ती आयोगा'ची स्थापना करावी आणि त्याचे अध्यक्षपद खासदार कंगना राणौतला द्यावं" असं म्हणत अलका लांबा यांनी कंगनाला खोचक टोला लगावला आहे.
Web Summary : Alka Lamba criticized Kangana Ranaut for her 'Tapori' comment on Rahul Gandhi, suggesting Kangana might face a fate similar to Smriti Irani's political disappearance. Lamba questioned Kangana's silence on BJP leaders accused of sexual assault, further alleging Kangana's past addiction affects her judgment.
Web Summary : अलका लांबा ने राहुल गांधी पर कंगना रनौत की 'टपोरी' टिप्पणी की आलोचना की, और कहा कि कंगना का हाल स्मृति ईरानी जैसा हो सकता है। लांबा ने यौन उत्पीड़न के आरोपी भाजपा नेताओं पर कंगना की चुप्पी पर सवाल उठाया और आरोप लगाया कि कंगना की पुरानी लत उनके फैसले को प्रभावित करती है।