शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसला दुसरा मोठा झटका देणार; शिवराजसिंहांचीही डोकेदुखी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 11:13 AM

ज्योतिरादित्य शिंदे भाजपाच्या कार्यालयातून काँग्रेसला आणखी एक जोरदार झटका देण्याच्या तयारीत आहेत. या कार्यक्रमामध्ये शिंदेच्या उपस्थितीत काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपात प्रवेश करणार आहेत.

भोपाळ : राज्यसभा खासदारकीची माळ गळ्यात पडल्यानंतर भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे पहिल्यांदाच भोपाळमध्ये येत आहेत. भोपाळ पोहोचल्यानंतर ते राजभवनामध्ये जाणार आहेत. मध्यप्रदेश सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार आहे. या शपथविधीला हजेरी लावून 12 वाजता ते राजभवनातून बाहेर पडतील व दुपारी 2.30 वाजता थेट भाजपाच्या कार्यालयात जाणार आहेत. या त्यांच्या कार्यक्रमामुळे काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. 

ज्योतिरादित्य शिंदे भाजपाच्या कार्यालयातून काँग्रेसला आणखी एक जोरदार झटका देण्याच्या तयारीत आहेत. या कार्यक्रमामध्ये शिंदेच्या उपस्थितीत काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपात प्रवेश करणार आहेत. मात्र, अद्याप या नेत्यांमध्ये कोणकोण आहे याची नावे बाहेर आलेली नाहीत.  मात्र, शिंदे यांनी काँग्रेसच्या नेत्यांचे टेन्शन वाढविले आहे. कारण शिंदे नसतानाही अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. 

मध्यप्रदेशमध्ये चार महिन्यांपूर्वी शिंदे यांनी काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडून खळबळ उडवून दिली होती. राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे असलेल्या शिंदे यांनीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत 22 आमदार फोडले होते. यामुळे या जागांवर पोटनिवडणूक होऊ घातली आहे. यापैकी 16 जागा या शिंदे यांचे प्राबल्य असलेल्या ग्वाल्हेर, चंबळ भागातील आहेत. यामुळे या उमेदवारांना जिंकवून देण्याची जबाबदारीही शिंदे यांचीच आहे. यामुळे या भागातून काँग्रेसचे मोठे नेतेही भाजपात सहभागी होण्याची शक्यता आहे. 

शिवराजसिंहांच्या मंत्रिमंडळात ताकद वाढणारकमलनाथ सरकारमधील 6 मंत्री हे शिंदे यांच्या गटातील होते. त्यांच्यासह अन्य 16 आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. आता शिंदे यांच्यामुळे पुन्हा सत्तेची चावी मिळालेल्या भाजपाच्या शिवराजसिंह सरकारमध्ये शिंदे यांचे 12 समर्थक मंत्री होणार आहेत. यामुळे शिंदे यांचे मध्य प्रदेश सरकारमधील वर्चस्व वाढणार असून शिवराजसिंहाना डोकेदुखीचे ठरणार आहे. शिवराजसिंहांनी बुधवारीच दिल्लीहून परतल्यानंतर महामंथनातून अमृत निघाले होते, पण विष भगवान शिव यांनी प्राशन केले होते, अशी प्रतिक्रिया दिली होती. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

FD पेक्षाही जास्त व्याज देणार; केंद्र सरकारची 'अफलातून' योजना लाँच

OMG! पॉझिटिव्ह रिपोर्ट दुसरीचाच; तरुणीला तीन दिवस कोरोना बाधितांसोबत 'डांबले'

खिंडीत गाठले! भारताने चीनच्या दुखऱ्या नसीवरच बोट ठेवले; ड्रॅगनचा श्वास कोंडला

ब्रेझा, व्हेन्यूला टक्कर देणार; स्वस्त किंमत ठेवून जगप्रसिद्ध कंपनी बाजार 'खेचणार'

आता नितीन गडकरी उतरले मैदानात; चिनी कंपन्यांना दणका देण्याचा जबरदस्त 'हायवे प्लॅन' तयार

लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज

गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार

तब्बल 40000 रुपयांनी स्वस्त झाला आयफोन; जाणून घ्या किंमत

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी