चीनला नितीन गडकरींचा जोरदार धक्का; कंपन्यांना हायवे प्रकल्पांमध्ये बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 04:36 PM2020-07-01T16:36:38+5:302020-07-01T17:07:12+5:30

India China FaceOff: केंद्र सरकारने मंगळवारी चीनच्या 69 अ‍ॅपवर बंदी घातली होती. यामध्ये टिकटॉक, हॅलो, युसी वेब आदी अ‍ॅप आहेत. तर रेल्वे, बीएसएनएलनेही चिनी कंपन्यांना दिलेली कंत्राटे रद्द केली आहेत.

Nitin Gadkari in Action; China companies will not allowed in Indian highway projects | चीनला नितीन गडकरींचा जोरदार धक्का; कंपन्यांना हायवे प्रकल्पांमध्ये बंदी

चीनला नितीन गडकरींचा जोरदार धक्का; कंपन्यांना हायवे प्रकल्पांमध्ये बंदी

Next

नवी दिल्ली : चीनविरोधात भारताने मोर्चेबांधणी वेगवान केलेली असताना आता केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. सरकारने अ‍ॅप बॅन केलेले असताना आता गडकरींनी हायवे प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांची एन्ट्री बंद करण्याची मोठी घोषणा केली आहे. 


नितीन गडकरी यांनी बुधवारी सांगितले की, जर चीनच्या कोणत्याही कंपनीने भागीदारी करत अन्य कोणत्याही कंपनीद्वारे हायवे प्रकल्प लाटायचा प्रयत्न केल्यास त्यांना रोखले जाणार आहे. याशिवाय सरकारही MSME सेक्टरमध्ये चिनी कंपन्यांना सहभागी होऊ न देण्यासाठी पडताळणी करणार आहे. 
केंद्र सरकार लवकरच चीनविरोधी पॉलिसी आणणार असून त्या द्वारे चिनी कंपन्यांची भारतीय प्रकल्पांमध्ये एन्ट्री बंद होईल. भारतीय कंपन्यांसाठी नियम सोपे केले जाणारा आहेत. कोणत्याही प्रकल्पात भारतीय कंपन्यांना अधिकाधिक संधी कशी मिळेल याचाही या पॉलिसीमध्ये विचार केला जाणार असल्याचे गडकरी म्हणाले. 


...तर निविदा रद्द होईल
हायवे प्रकल्पांमध्ये सध्याच्या घडीला काही असे प्रकल्प आहेत, ज्यामध्य़े चीनची गुंतवणूक आहे. मात्र, चालू स्थितीमध्ये जर कोणत्या टेंडरमध्ये जर कोणत्याही चायनिज व्हेंचरसोबत मिळून भारतीय कंपनीने निविदा भरलेली असल्यास किंवा त्यांना ते मिळाल्यास प्रक्रियाच रद्द करून पुन्हा नव्याने राबविण्यात येणार असल्याचा इशारा गडकरी यांनी दिला. हा नियम सध्या आलेल्या किंवा भविष्यातील निविदा प्रक्रियांसाठी लागू असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


चीनविरोधात कारवाई
गलवान घाटीमध्ये हिंसक घटना घडल्यानंतर भारतात #BoycottChina मोहिम सुरु झाली. यानंतर रेल्वेने मोठा निर्णय घेत चिनी कंपनीला दिलेले 471 कोटींचे कंत्राट रद्द केले होते. 16 जूनला गलवानमध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले होते. रेल्वेने हा निर्णय 18 जूनला घेतला होता. तर बीएसएनएल आणि  एमटीएनएलने चीनच्या कंपन्यांना दिलेले 4जी चे कंत्राट आजच रद्द केले आहे. केंद्र सरकारने मंगळवारी चीनच्या 69 अ‍ॅपवर बंदी घातली होती. यामध्ये टिकटॉक, हॅलो, युसी वेब आदी अ‍ॅप आहेत. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज

गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार

झोपच उडाली! गुराख्याला कोरोना झाला; कर्नाटकात 47 बकऱ्या केल्या क्वारंटाईन

नक्कलबाजीने चीनला पोखरले! सर्वात मोठा घोटाळा; 83 टन सोने बनावट निघाले

तब्बल 40000 रुपयांनी स्वस्त झाला आयफोन; जाणून घ्या किंमत

Unlock1 सरन्यायाधीश शरद बोबडेंनाही Harley Davidsonचा मोह आवरेना...

हीच ती वेळ! कोरोना काळाची वक्रदृष्टी पडलीय; असे कमवा 'बक्कळ' उत्पन्न

Read in English

Web Title: Nitin Gadkari in Action; China companies will not allowed in Indian highway projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.