शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

Jyoti Malhotra : "पप्पा, तुम्ही खंबीर राहा, मी बेकायदेशीर काम केलेलं नाही"; जेलमध्ये काय म्हणाली ज्योती मल्होत्रा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 10:21 IST

Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राची तिचे वडील हरीश मल्होत्रा यांच्याशी भेट झाली आहे.

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राची तिचे वडील हरीश मल्होत्रा यांच्याशी भेट झाली आहे. ​​मंगळवारी हिसार सेंट्रल जेल-२ मध्ये  मुलीला भेटण्यासाठी हरीश आले होते. ते ज्योतीशी जवळपास २० मिनिटं बोलले. याच दरम्यान त्यांनी ज्योतीला काही कपडे दिले.

आपली मुलगी जेलमध्ये असलेली पाहून हरीश मल्होत्रा ​​भावुक झाले. ज्योतीने वडिलांना सांगितलं की, "तुम्ही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. मी लवकरच बाहेर येईन. पप्पा, तुम्ही खंबीर राहा, मी कोणतंही बेकायदेशीर काम केलेलं नाही." वडील-मुलीची भेट सामान्य कैद्यांप्रमाणे झाली.

 पाकिस्तानात फिरताना ज्योतीच्या आजुबाजुला AK-47 घेऊन ६ गनर्स, Video ने उलगडलं रहस्य

ज्योती मल्होत्राला सोमवारी १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. तिचे वडील सकाळी १० वाजता जेल परिसरात गेले आणि त्यांनी त्यांच्या मुलीला भेटण्याची विनंती केली. जेलच्या रजिस्टरमध्ये नोंद केल्यानंतर त्यांना जेलच्या नियमांनुसार त्यांना आत पाठवण्यात आलं.

"पप्पा, टेन्शन घेऊ नका, वकील पाहू नका, मी लवकर बाहेर येईन"; ज्योती मल्होत्राची वडिलांशी भेट

हरीश मल्होत्रा ​​यांना ज्योतीला भेटण्याची परवानगी देण्यात आली. पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर मी बाहेर येईन असं ज्योतीने वडिलांना सांगितलं. पोलिसांनी १८ मे रोजी ज्योतीला अटक केली आणि तिला पाच दिवसांची कोठडी सुनावली. त्यानंतर २३ मे रोजी तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं आणि चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आता २६ मे रोजी न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली.

ज्योतीने मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर; पोलिसांना मिळाले अनेक महत्त्वाचे पुरावे

ज्योती मल्होत्राच्या प्रकरणात पोलीस वेगाने तपास करत आहेत. चौकशीदरम्यान हरियाणा पोलिसांनी तिच्या मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर केला, ज्यामुळे अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले. फॉरेन्सिक तपासणीनंतर पोलिसांना काही पुरावे सापडले आहेत जे या संपूर्ण प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्यास खूप मदत करू शकतात. 

टॅग्स :Jyoti Malhotraज्योती मल्होत्राPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरTerrorismदहशतवादPakistanपाकिस्तानCrime Newsगुन्हेगारीjailतुरुंग