शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 17:54 IST

Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj News: धार्मिक गोष्टींसाठी मंदिरे तोडण्यात आलेली नाहीत, असा दावा शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी केला.

Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj News: मशीद बांधत असतील तर त्याला आक्षेप नाही. मशीद बांधून तिथे ईश्वराची आराधना आपापल्या पद्धतीने करा. यात आम्ही आजपर्यंत आक्षेप घेतला नाही आणि भविष्यातही घेऊ असे वाटत नाही. परंतु, कोणी बाबरचे नाव घेऊन, त्याला समर्थन देत असेल, तर मात्र त्याच पद्धतीने त्याच्याशी व्यवहार केला जाईल. बाबर आक्रमणकर्ता होता, त्याला आजही आक्रमणकर्ताच मानतो. भारतावर आक्रमण करून बाबरने इथल्या लोकांवर अत्याचार केले. जर कोणी स्वतःला बाबरशी संबंधित असल्याचे सांगितले तर आम्ही त्यांनाही आक्रमणकर्ताच मानू आणि त्यालाही त्यानुसार वागणूक दिली जाईल, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी स्पष्ट केले. टीएमसी आमदार हुमायू कबीर यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर शं‍कराचार्यांनी सदर प्रतिक्रिया दिली.

प्रसार माध्यमांशी बोलताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज म्हणाले की, मथुरा आणि काशी येथे सुरक्षा वाढवण्याची गरज काय आहे. ज्यांचा त्यावर हक्क आहे, त्यांना ते उपलब्ध झाले पाहिजे. तिथे पूजन, धार्मिक विधी झाले पाहिजेत. विश्व कल्याणासाठी प्रार्थना करावी. संपूर्ण विश्वाच्या संकल्पनेत तेही लोक येतात. जे त्या ठिकाणी कब्जा करून बसलेत, त्यांचेही यातून कल्याण होईल. जे कब्जा करून बसलेत, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, एकेकाळी राजकारण करण्यासाठी या गोष्टी करण्यात आल्या. धार्मिक गोष्टींसाठी मंदिरे तोडण्यात आलेली नाहीत, असा दावा शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी केला.

आम्ही तुम्हाला नेस्तनाबूत करू

इस्लाम कधी असे सांगत नाही की, दुसऱ्या धर्माची प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करून तिथे आपली उपासना स्थळे बांधावीत. ही गोष्ट इस्लाममध्ये योग्य मानली गेलेली नाही. परंतु, असे करण्यात आले, ते धार्मिक कारणांसाठी नाही, तर राजकीय कारणांसाठी करण्यात आले. आम्ही तुम्हाला नेस्तनाबूत करू, अशी भावना मनात ठेवून हे सगळे करण्यात आले. जी बाब राजकीय कारणांमुळे झाली, त्याला धार्मिक रंग का देण्यात येत आहे. याचाच अर्थ त्यांच्या मनात अजूनही तेच राजकारण आहे. मुस्लीम समाजाने एकत्र बसून या गोष्टीवर विचार करायला हवा की, माझ्या धर्मात काय योग्य सांगितले गेले आहे. परंतु, दुसऱ्या धर्माचे प्रार्थना स्थळ उद्ध्वस्त करूनच तुमचा ईश्वर तुमची उपासना कबूल करून घेतो, असे जर त्यांचा धर्म सांगत असेल, तर मग काय बोलणार, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज म्हणाले.

दरम्यान, त्यांचे जे धर्मग्रंथ आहेत, ते पाहिल्यास त्यात असे आढळून आले की, दुसऱ्यांचे प्रार्थना स्थळ उद्ध्वस्त करून तिथे तुम्ही तुमचे काही बांधले आणि उपासना केली, तर अशी प्रार्थना त्यांच्या ईश्वरापर्यंत पोहोचत नाही. असे असेल तर दररोज याबाबत तुम्ही का एकत्रित येऊन बिनकामाची मेहनत करता. तुमची प्रार्थना स्वीकारलीच जाणार नसेल, तर तिथे जाऊन उपासना करण्यात काय अर्थ आहे. त्या काळातील राजकीय परिस्थिती वेगळी होती, आजही परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे अशा गोष्टींवर भर देण्यात काही अर्थ नाही, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : No objection to mosques, temples weren't demolished for religion: Shankaracharya

Web Summary : Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati stated mosques are acceptable for worship, but opposition arises if Babar is supported. He deemed Babar an invader. Temples weren't destroyed for religious reasons but political ones. Muslims should reflect on whether their faith truly requires demolishing other's places of worship.
टॅग्स :TempleमंदिरMosqueमशिद