शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 19:43 IST

आर्थिक संकटातील बँकांनी थिरुनेल्ली मंदिराचे मुदत ठेव परत देण्यास नकार दिल्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; फक्त धार्मिक कार्यांसाठीच पैशाचा वापर करण्याचे स्पष्टीकरण.

 

नवी दिल्ली: मंदिरात जमा झालेला पैसा ही देवतेची मालमत्ता असते आणि आर्थिक संकटात असलेल्या सहकारी बँकांना वाचवण्यासाठी या पैशाचा वापर केला जाऊ शकत नाही, असा महत्त्वाचा आणि स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. केरळ उच्च न्यायालयाने थिरुनेल्ली मंदिर देवस्वोमचे मुदत ठेव त्वरित परत करण्याचे जे आदेश दिले होते, त्या आदेशाला आव्हान देणाऱ्या सहकारी बँकांच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या.

मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान कठोर टिप्पणी केली. खंडपीठाने स्पष्ट केले की, जर एखादी बँक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल, तर मंदिराचा निधी त्यांच्या मदतीसाठी वापरला जाऊ शकत नाही. मंदिराचा पैसा केवळ मंदिर आणि देवतेच्या हितासाठीच वापरला जाऊ शकतो, असे न्यायालयाने ठामपणे सांगितले.

यावेळी न्यायालयाने विचारले की, 'जेव्हा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये सुरक्षितपणे आणि अधिक व्याजदराने रक्कम ठेवता येते, तेव्हा आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी बँकेत मंदिराचा निधी का ठेवला जावा?' ग्राहकांना आकर्षित करता येत नसेल, तर ती बँकेची समस्या आहे; मंदिराचा पैसा त्यांच्यासाठी आधारवड ठरू शकत नाही, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. थिरुनेल्ली देवस्वोमने वारंवार विनंती करूनही बँका एफडीची रक्कम परत करत नसल्याने हा वाद निर्माण झाला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Temple Funds are God's Property, Banks Can't Misappropriate: Supreme Court

Web Summary : The Supreme Court ruled temple funds are for temple use only. Ailing cooperative banks cannot use them. The court questioned why temple funds were in unstable banks when safer options existed. Banks must return Thurunelli temple's deposits.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयKeralaकेरळ