ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 23:41 IST2025-05-18T23:37:44+5:302025-05-18T23:41:15+5:30

Jyoti Malhotra Spying for Pakistan News: यु-ट्यूबरचा बुरखा पांघरून पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला अटक झाली. तिची सध्या चौकशी सुरू असून, हरयाणा पोलिसांनी तिच्याबद्दल आणखी एक मोठा खुलासा केला आहे. 

Jyoti Malhotra became Pakistan's 'asset', was in contact with the enemy during 'Operation Sindoor' | ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात

ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात

Jyoti Malhotra Youtuber news: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात अटक झालेल्या ज्योती मल्होत्राबद्दल नवीन माहिती समोर येऊ लागली आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या काळात ती काय करत होती, याबद्दल पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानसाठी एक 'अ‍ॅसेट' म्हणजे खास व्यक्ती बनलेली होती. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ज्योती मल्होत्राला शनिवारी रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर ती कशापद्धतीने पाकिस्तानी व्यक्तीच्या संपर्कात आली. ती कोणत्या व्यक्तींना भेटली याबद्दलही माहिती समोर आली आहे. 

पोलिसांनी ज्योती मल्होत्राबद्दल काय सांगितले?

पोलीस अधीक्षक शशांक कुमार सावन यांनी सांगितले की, ज्योती मल्होत्रा ही थेट पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. तिने पाकिस्तानसोबतच चीनचेही दौरे केले. 

वाचा >>ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर ७ मे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला होता. दोन्ही देश एकमेकांवर हवाई हल्ले करत होते. त्या काळातही ती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. तिने पाकिस्तानी दूतावासातील एका अधिकाऱ्यालाही संपर्क केला होता, असे पोलिसांनी सांगितले. 

हिसारचे पोलीस अधीक्षक शशांक कुमार सावन म्हणाले, 'ज्योती मल्होत्रा ही ट्रॅव्हल विथ जो नावाने एक यु ट्यूब चॅनेल चालवते. तिच्यावर ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट आणि भारतीय न्याय संहितेतील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ज्योती वापरत असलेली उपकरणे तपासणीसाठी

ज्योती मल्होत्राकडील मोबाईलसह इतर सर्व संपर्काच्या वस्तू तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आल्या आहेत. त्यातून हे समोर येईल की, ज्योती मल्होत्राने पाकिस्तानला भारताबद्दल कोणती-कोणती माहिती दिली होती. ती सातत्याने पाकिस्तानी एजंट्स संपर्कात होती, हे मात्र समोर आले आहे. 

Web Title: Jyoti Malhotra became Pakistan's 'asset', was in contact with the enemy during 'Operation Sindoor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.