शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

NDA मध्ये सामील व्हा, जास्त निधी मिळेल; रामदास आठवलेंची केरळच्या मुख्यमंत्र्यांना ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:49 IST

सत्ताधारी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) ने या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Ramdas Athawale: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास अठावले यांच्या एका विधानामुळे केरळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये सहभागी व्हावे, असा सल्ला अठावले यांनी दिला. असे झाल्यास केरळला केंद्र सरकारकडून अधिक निधी मिळू शकेल, असा दावाही त्यांनी केला. मात्र सत्ताधारी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) (माकपा) ने या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त करत याला ‘अलोकशाही आणि असंवैधानिक’ ठरवले आहे.

अठावले नेमकं काय म्हणाले?

कन्नूर येथे पत्रकारांशी बोलताना अठावले म्हणाले की, जर पिनाराई विजयन NDA मध्ये सहभागी झाले, तर केरळला केंद्राकडून अधिक निधी मिळेल आणि माकपाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडी सत्तेत टिकू शकेल. भाजप आणि माकपा विचारधारेने विरोधी असले, तरी विजयन यांचा NDA मध्ये प्रवेश हा क्रांतिकारी निर्णय ठरेल. समाजवादी पक्ष सहभागी होऊ शकतात, तर कम्युनिस्ट का नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

भाकपालाही NDA मध्ये येण्याचा सल्ला

अठावले यांनी डाव्या आघाडीतील दुसरा मोठा पक्ष असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षालाही भाजपप्रणीत आघाडीत सहभागी व्हावे, असा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळसाठी मोठे आर्थिक पॅकेज देतील आणि त्याचा उपयोग राज्याच्या विकासासाठी करता येईल, असे त्यांनी नमूद केले.

केंद्राविरोधात LDF चा आरोप

या महिन्याच्या सुरुवातीला मुख्यमंत्री विजयन यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट (LDF) ने केंद्र सरकारविरोधात आंदोलन केले होते. केंद्र सरकार केरळला मिळणारा आवश्यक निधी रोखत असल्याचा आरोप LDF ने केला होता. केरळचे महसूल मंत्री एम. बी. राजेश यांनी केंद्र सरकारने अनेक केंद्रीय योजनांमधील अनुदान कमी केले असून देयकांमध्ये विलंब होत असल्याचा आरोप केला.

माकपाची तीव्र प्रतिक्रिया

अठावले यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना माकपाचे राज्य सचिव एम. व्ही. गोविंदन यांनी हे वक्तव्य “अलोकशाही आणि असंवैधानिक” असल्याचे म्हटले. गोविंदन यांचा दावा आहे की, मागील पाच वर्षांत केरळला सुमारे २ लाख कोटी रुपयांचा हक्काचा निधी केंद्राने दिलेला नाही. केंद्रीय मंत्र्यांचे असे वक्तव्य संविधानिक तत्त्वे आणि संघराज्य व्यवस्थेवर थेट हल्ला आहे. अशा विधानांमागे सर्व संविधानिक संस्थांना RSS च्या प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न असल्याचा आणि देश हुकूमशाही व निओ-फॅसिझमकडे झुकत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान वाढले

केरळमध्ये यावर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी LDF आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (UDF) यांच्यात कडवी लढत अपेक्षित आहे. तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत मिळालेल्या विजयामुळे भाजपप्रणीत NDA साठी राज्यात नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक त्रिशंकू होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Join NDA for funds, Athawale offers Kerala CM

Web Summary : Ramdas Athawale invited Kerala CM to join NDA for more funding. CPI(M) strongly criticized the offer, calling it undemocratic. Elections approach, political tensions rise.
टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेKeralaकेरळBJPभाजपा