जेएनयूमध्ये अजून एक मोहम्मद अली जिन्ना जन्मू देणार नाही - योगी आदित्यनाथ

By Admin | Updated: March 5, 2016 16:45 IST2016-03-05T16:45:01+5:302016-03-05T16:45:01+5:30

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) अजून एक मोहम्मद अली जिन्ना जन्मू देणार नाही असं वक्तव्य भाजपा खासदार योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे

Jinnah will not give birth to another Mohammed Ali Jinnah - Yogi Adityanath | जेएनयूमध्ये अजून एक मोहम्मद अली जिन्ना जन्मू देणार नाही - योगी आदित्यनाथ

जेएनयूमध्ये अजून एक मोहम्मद अली जिन्ना जन्मू देणार नाही - योगी आदित्यनाथ

>ऑनलाइन लोकमत - 
गोरखपूर, दि. ५ - जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) अजून एक मोहम्मद अली जिन्ना जन्मू देणार नाही असं वक्तव्य भाजपा खासदार योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. देशभरात देशद्रोहावर चर्चा सुरु असताना भाजपा मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे केंद्र सरकारच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. 
 
'जेएनयूमध्ये अजून एक मोहम्मद अली जिन्ना जन्मू देणार नाही, आणि जर झाल्यास त्याला दफन करुन टाकू. आम्ही देशद्रोहींविरोधात सक्त आहोत' असं वक्तव्य भाजपा खासदार योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मतदारसंघात प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे. 
 

Web Title: Jinnah will not give birth to another Mohammed Ali Jinnah - Yogi Adityanath