शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जेठमलानींनी घेतली जेटलींची उलटतपासणी

By admin | Updated: March 7, 2017 03:59 IST

केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी जेटली यांची दिल्ली उच्च न्यायालयात सुमारे दोन तास कसून उलटतपासणी घेतली

नवी दिल्ली : केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दिवाणी दाव्यात केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी जेटली यांची दिल्ली उच्च न्यायालयात सुमारे दोन तास कसून उलटतपासणी घेतली.केजरीवाल व ‘आप’च्या अन्य चार नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन जेटली यांनी दिल्ली क्रिकेट संघटनेचे १० वर्षे अध्यक्ष असताना भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचे आरोप केले होते. त्यासंदर्भात जेटली यांनी केजरीवाल व इतरांवर न्यायालयात बदनामीचा फौजदारी खटला तर दिल्ली उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा १० कोटी रुपयांचा दिवाणी दावा दाखल केला आहे.दिल्ली उच्च न्यायालयात फिर्यादी म्हणून जेटली साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहिले. प्रतिवादींच्या वतीने जेठमलानी यांनी दोन तास उलटतपासणी घेताना जेटलींना सुमारे ५० प्रश्न विचारले. साक्षीदार व उलटतपासणी घेणारे हे दोघेही मातब्बर वकील असल्याने त्यांच्यातील जुगलबंदी चांगलीच रंगली.जेठमलानी यांच्या प्रश्नांचा रोख जेटलींच्या दाव्याला आधार नाही, कारण मुळात त्यांची अब्रुनुकसानीच झालेली नाही, यावर होता. केजरीवाल निराधार आरोपांनी आपल्या इभ्रतीची अपरिमित हानी झाली व त्याची भरपाई खरे तर पैशाने होऊ शकत नाही, असे जेटली यांनी म्हटले होते.जेठमलानी यांनी जेटलींना विचारले की, तुम्ही तुमच्या प्रतिष्ठेच्या हानीचे मूल्यमापन कशाच्या आधारे केले? याला काही ठोस आधार आहे की तुम्ही स्वत:च्या मोठेपणाची ही किंमत ठरविली आहे. यावर जेटलींनी शब्दांच्या कचाट्यात न अडकता असे उत्तर दिले की, माझे श्रेष्ठत्व व प्रतिष्ठा यांचे मूल्यप्मापन मी स्वत: करण्याचा हा प्रश्न नाही. समाजात, मित्र परिवारात व हितचिंतकांमध्ये जो मान आहे त्याआधारे केवळ प्रतिकात्मक म्हणून मी हा १० कोटी रुपयांचा दावा केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>अरविंद केजरीवाल यांना समन्सकेजरीवाल यांच्यावरील आणखी एक फौजदारी बदनामी खटला सोमवारी दंडाधिकारी न्यायालयात सुनावणीस आला व त्यात केजरीवाल यांना आरोपी म्हणून येत्या १९ जुलै रोजी जातीने हजर होण्याचे समन्स जारी करण्यात आले. राज्यसभा सदस्य सुभाष चंद्र यांनी हा बदनामी खटला दाखल केला आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात एका पत्रकार परिषदेत केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांवरून चंद्रा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना कोर्टात खेचले आहे.