७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 14:57 IST2025-10-02T14:57:12+5:302025-10-02T14:57:53+5:30
७५ वर्षीय व्यक्तीचा लग्नाच्या रात्रीच मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूमागचं गूढ आता उलगडलं आहे. ७५ वर्षांच्या व्यक्तीने ३५ वर्षांच्या महिलेशी लग्न केलं होतं.

७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे ७५ वर्षीय व्यक्तीचा लग्नाच्या रात्रीच मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूमागचं गूढ आता उलगडलं आहे. ७५ वर्षांच्या व्यक्तीने ३५ वर्षांच्या महिलेशी लग्न केलं होतं. मृत्यूनंतर घातपाताचा संशय व्यक्त केला गेला. पोलिसांनी पोस्टमॉर्टम केलं आणि रिपोर्टमध्ये मृत्यूचं खरं कारण समोर आलं आहे.
जौनपूरमधील कुछमुछ गावातील रहिवासी ७५ वर्षीय संगरू राम यांचं लग्नाच्या रात्रीच निधन झालं. त्यांनी सोमवारी ३५ वर्षीय मनभावती नावाच्या महिलेशी लग्न केलं होतं. त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि मृत्यू झाला. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला.
कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. गुरुवारी आलेल्या रिपोर्टमध्ये मृत्यूचं कारण शॉक/कोमा असल्याचं म्हटलं आहे, गौराबादशाहपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रवीण यादव यांनी पुष्टी केली.
संगरु राम यांच्या पत्नीचं एक वर्षापूर्वी निधन झालं होतं आणि त्यांना मुलं नव्हती. एकट्या राहणाऱ्या संगरु यांनी लग्नासाठी त्यांची जमीन ५ लाख रुपयांना विकली. लग्नाच्या खरेदीसाठी त्यांनी २०,००० रुपयेही दिले. ३५ वर्षीय मनभावती यांचं हे दुसरं लग्न होतं आणि त्यांना आधीच तीन मुलं आहेत.
मनभावती म्हणाल्या की, लग्नासाठी त्या तयार नव्हत्या, परंतु लग्नाची व्यवस्था करणाऱ्या व्यक्तीने त्यांना आश्वासन दिलं की संगरु तिच्या मुलांची काळजी घेतील. सोमवारी लग्न झाल्यानंतर संगरु यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.