जामिया मिलिया इस्लामियामध्ये खळबळ! 'रमजानमध्ये एकत्र दिसलात तर लग्न लावून देऊ'; 'त्या' व्हायरल नोटीसवर विद्यापीठाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 10:27 IST2026-02-25T10:25:38+5:302026-02-25T10:27:12+5:30

Jamia Millia Fake Nikah Notice: जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात रमजाननिमित्त 'निकाह'ची नोटीस व्हायरल झाली आहे. विद्यापीठ प्रशासनाने ही नोटीस बनावट असल्याचे सांगत एफआयआर दाखल केला आहे.

Jamia Millia Islamia stirs up controversy! 'If we see each other in Ramadan, we will get you married'; University clarifies on 'that' viral notice | जामिया मिलिया इस्लामियामध्ये खळबळ! 'रमजानमध्ये एकत्र दिसलात तर लग्न लावून देऊ'; 'त्या' व्हायरल नोटीसवर विद्यापीठाचे स्पष्टीकरण

जामिया मिलिया इस्लामियामध्ये खळबळ! 'रमजानमध्ये एकत्र दिसलात तर लग्न लावून देऊ'; 'त्या' व्हायरल नोटीसवर विद्यापीठाचे स्पष्टीकरण

दिल्लीतील प्रसिद्ध जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ सध्या एका विचित्र आणि वादग्रस्त नोटीसमुळे चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर एक नोटीस वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रमजानच्या पवित्र महिन्यात जर एखादे तरुण-तरुणी (कपल) कॅम्पसमध्ये एकत्र दिसले, तर त्यांचा तात्काळ निकाह लावून दिला जाईल. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने ही नोटीस पूर्णपणे 'फेक' असल्याचे सांगत या प्रकरणाची पोलीस तक्रार केली आहे.

विद्यापीठाच्या लेटरहेडवर छापल्यासारखी वाटणारी ही नोटीस २० फेब्रुवारी २०२६ रोजीची असल्याचे भासवले गेले आहे. यावर रजिस्ट्रार आणि शैक्षणिक शाखेच्या अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्याही आहेत. नोटीसमध्ये म्हटले आहे की, "रमजानमध्ये मुलगा आणि मुलगी जोडीने दिसणे पूर्णपणे वर्जित आहे. जर कोणी असे आढळले, तर त्यांचा तात्काळ निकाह लावून दिला जाईल आणि वलीमाचा (जेवणाचा) खर्च त्यांना स्वतःला करावा लागेल."

विद्यापीठ प्रशासनाची भूमिका
जामिया प्रशासनाने अधिकृत पत्रक काढून स्पष्ट केले आहे की, विद्यापीठाने असा कोणताही आदेश जारी केलेला नाही. ही विद्यापीठाची प्रतिमा मलीन करण्यासाठी काही खोडसाळ घटकांनी रचलेले कटकारस्थान आहे. विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि त्या पुढे फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पोलीस तक्रार आणि तपास
प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेत दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. बनावट नोटीस तयार करणाऱ्या आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सवर पसरवणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी विद्यापीठाने केली आहे.

Web Title : जामिया मिलिया इस्लामिया ने जबरन विवाह नोटिस का खंडन किया; पुलिस में शिकायत दर्ज।

Web Summary : जामिया मिलिया इस्लामिया ने एक वायरल नोटिस का खंडन किया जिसमें दावा किया गया था कि रमजान के दौरान जोड़ों की जबरन शादी की जाएगी। विश्वविद्यालय प्रशासन ने नोटिस को फर्जी बताया और मामले की जांच के लिए पुलिस में शिकायत दर्ज कराई।

Web Title : Jamia Millia Islamia denies forced marriage notice; files police complaint.

Web Summary : Jamia Millia Islamia refuted a viral notice claiming couples would be forcibly married during Ramadan. The university administration declared the notice fake and filed a police complaint to investigate the matter.