जय श्रीराम! इलॉन मस्क यांचे वडील इरॉल मस्क यांनी अयोध्येत घेतले रामललाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 07:24 IST2025-06-05T07:24:30+5:302025-06-05T07:24:51+5:30

हा अनुभव अद्भुत आणि सर्वोत्तम होता, असे ते म्हणाले

Jai Shri Ram! Elon Musk's father Errol Musk visited Ram Lalla in Ayodhya temple | जय श्रीराम! इलॉन मस्क यांचे वडील इरॉल मस्क यांनी अयोध्येत घेतले रामललाचे दर्शन

जय श्रीराम! इलॉन मस्क यांचे वडील इरॉल मस्क यांनी अयोध्येत घेतले रामललाचे दर्शन

अयोध्या (उत्तर प्रदेश) : जगातील आघाडीचे उद्योगपती इलॉन मस्क यांचे वडील इरॉल मस्क यांनी बुधवारी दुपारी अयोध्येतील श्रीराम मंदिरात दर्शन घेतले. हा अनुभव अद्भुत आणि सर्वोत्तम होता, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी हनुमानगढी मंदिरात पूजा-अर्चना केली. दोन्ही मंदिरांतील दर्शनानंतर ते म्हणाले की, मी आजवर केलेल्या सर्वोत्तम कामांपैकी हे एक आहे. हे मंदिर पाहून मी आनंदित झालो आहे. हे फारच मोठे मंदिर आहे. जगातील आश्चर्याप्रमाणेच हे असेल. भारतातील माझा अनुभव खूपच चांगला राहिलेला आहे. मंदिर आणि येथील लोकही अद्भुत आहेत. 

आपली मुलगी अलेक्झांड्रा मस्क हिच्यासमवेत इरॉल मस्क दुपारी अडीच वाजता अयोध्या विमानतळावर पोहोचले आणि चार वाजता परतले. श्रीराम मंदिरातील दर्शनाच्या वेळी त्यांनी कुर्ता-पायजमा परिधान केलेला होता. शहरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

Web Title: Jai Shri Ram! Elon Musk's father Errol Musk visited Ram Lalla in Ayodhya temple