CoronaVirus News : जगन्नाथ रथयात्रा न्यायालयाकडून स्थगित; कारागिरांच्या डोळ्यांत आले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 01:15 AM2020-06-22T01:15:20+5:302020-06-22T06:27:11+5:30

जगन्नाथाचा रथ खूप मोठा असतो व तो काही लाख भक्त ओढतात. या भाविकांमध्ये विश्वकर्मा (सुतार), लोहार, रंगकाम करणारे, कपडे शिवणारे आणि भोई असतात.

Jagannath Rathyatra adjourned by court; Tears came to the eyes of the artisans | CoronaVirus News : जगन्नाथ रथयात्रा न्यायालयाकडून स्थगित; कारागिरांच्या डोळ्यांत आले पाणी

CoronaVirus News : जगन्नाथ रथयात्रा न्यायालयाकडून स्थगित; कारागिरांच्या डोळ्यांत आले पाणी

Next

पुरी (ओदिशा) : जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथांची रथयात्रा यावर्षी कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे काढली जाणार नाही, हे वृत्त समजताच हा महारथ तयार करण्याचे काम असलेल्या असंख्य कारागिरांच्या डोळ्यांत पाणी आले. जगन्नाथाचा रथ खूप मोठा असतो व तो काही लाख भक्त ओढतात. या भाविकांमध्ये विश्वकर्मा (सुतार), लोहार, रंगकाम करणारे, कपडे शिवणारे आणि भोई असतात.
सर्वोच्च न्यायालयाने १८ जून रोजी दिलेल्या आदेशात नागरिकांच्या आरोग्यहितासाठी यावर्षी जगन्नाथ रथयात्रेला परवानगी दिली जाणार नाही, असे म्हटले. नऊ दिवसांचा हा रथयात्रा महोत्सव २३ जूनपासून सुरू होईल. श्री जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समिती आणि सेवेकऱ्यांनी राज्य सरकारला विनंती केली की, त्याने सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या आदेशात बदल करावा, अशी विनंती करणारी याचिका करावी. १७३६ पासून ही रथ यात्रा कोणताही अडथळा न येता सुरू राहिली होती. १५५८ आणि १७३५ यादरम्यान मुघलांच्या स्वाऱ्यांमुळे ३२ वेळा रथयात्रा झाली नव्हती, असे जगन्नाथ संस्कृतीचे संशोधक भास्कर मिश्र यांनी सांगितले. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची बातमी वाचल्यावर मला धक्काच बसला. रथावर शेवटचा हात फिरवत असताना मला ही बातमी समजली,’ असे भगवान जगन्नाथ रथ ‘नंदिघोष’चे मुख्य सुतार बिजय कुमार महापात्रा यांनी सांगितले. ‘रथांचे काम पूर्ण झाल्यानंतर ते वापरले जाणार नाहीत अशी परिस्थिती याआधी कधी आल्याचे मी पाहिले नव्हते. मी लहानपणापासून रथनिर्मितीत गुंतलेला आहे. असे भगवान बलभद्र यांच्या ‘तलध्वज’ रथाचे मुख्य सुतार नरसिंह महापात्रा यांनी सांगितले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. महापात्रा म्हणाले, ‘जर रथ मंदिरासमोरील विशाल रस्त्यावर ओढलेच जाणार नसतील, तर आमची कोरोना चाचणी करून उपयोग काय? रथबांधणीचे काम करणाºयांपैकी अनेक जण म्हणाले की, ‘आम्ही पैशांसाठी हे काम करीत नाहीत, तर जगन्नाथांवरील प्रेम, आदर म्हणून. रथ खाला (मंदिराची कार्यशाळा) वगळता इतरत्र कुठेही आमच्यासह कोणीही असे सुंदर रथ तयार करू शकत नाहीत. कोणतेही औपचारिक शिक्षण नसलेले लोक एवढे आकर्षक रथ बनवू शकतात, ही भगवंतांचीच इच्छा आहे.’
>रथयात्रा रोखणे हा मोठा कट -सरस्वती
भुवनेश्वर : भगवान जगन्नाथांची रथयात्रा होऊ न देण्याचा मोठा कट असल्याचा आरोप पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी रविवारी केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशात त्यानेच बदल करावा, अशी विनंती करणारी याचिका राज्य सरकारने करावी, अशी विनंती मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याकडे गजपती महाराज दिव्यासिंघ डेब आणि सेवेकºयांनी केल्यानंतर सरस्वती यांनी हा आरोप केला आहे.
एका व्हिडिओ मेसेजमध्ये शंकराचार्य म्हणाले की, ‘२० जून रोजी सर्वोच्च न्यायालय त्याच्या १८ जून रोजी दिलेल्या आदेशात दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका स्वीकारू शकले असते. सुटीच्या दिवसांतही महत्त्वाची प्रकरणे सुनावणीस घेणे ही रूढी आहे.’

Web Title: Jagannath Rathyatra adjourned by court; Tears came to the eyes of the artisans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.