शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालयात झाला जादूटोणा पंढरपूर : मानवी कवटी, हाडे व लिंबूंची टाचणी टोचून झाली पूजा

By admin | Updated: June 17, 2015 01:33 IST

१६पंड०१, ०२

१६पंड०१, ०२
फोटो - पंढरपुरात येथील तहसील कार्यालयाच्या आवारात जादूटोणा करण्यासाठी मानवी कवटी व हाडांची पूजा करण्यात आली. याची पाहणी करताना उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव, तहसीलदार गजानन गुरव, पोनि. किशोर नावंदे, पोनि. दयानंद गावडे. (छाया - सचिन कांबळे)
पंढरपूर : सध्याच्या युगात सर्वत्र अत्याधुनिक व विकसनशील प्रणाली आल्याने अंधश्रद्धा कमी झाली असे अनेक जण म्हणत असले तरी मात्र पंढरपुरातील तहसील कार्यालयाच्या आवारात अज्ञात व्यक्तीने अमावस्या गाठून मानवी कवटी व हाडांची पूजा करून जादूटोणा करण्याचा प्रयत्न केल्याने आजही अंधश्रद्धेतून मानव मुक्त झाला नसल्याचे चित्र पंढरपुरात पाहावयास मिळाले.
पंढरपुरतील तहसील कार्यालयाच्या आवारातील सेतू कार्यालयाच्या शेजारी अज्ञात व्यक्तीने मानवी कवटी, हाडे त्याचबरोबर हळदी-कुंकू व टाचण्या टोचलेल्या लिंबांची अघोरी पूजा केली आहे. दस्त लेखक सुधीर उर्फ तात्या महाराज सुरेश साळंुखे अंधश्रद्धेच्या गोष्टींवर जादा विश्वास ठेवतात. हे जाणून घेऊन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने साळंुखे रोज दस्त लेखन करण्यासाठी बसत असलेल्या ठिकाणी ही अघोरी पूजा केली आहे. यामुळे सुधीर उर्फ तात्या महाराज साळंुखे घाबरले असून त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. याबाबत तहसीलदार गजानन गुरव यांनी पोलिसांना पत्र पाठवून चौकशीचे आदेश दिले आहेत.
घटना समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव, तहसीलदार गजानन गुरव, पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर पोलिसांनी पूजेच्या ठिकाणावरील मानवी कवटी व हाडे व पूजेचे साहित्य ताब्यात घेतले.
कोट -
तहसील कार्यालयाच्या आवारात मी ऑनलाईन दस्त लेखनाचे काम करतो. माझा व्यवसाय तेजीत आहे, त्यामुळे माझ्या स्पर्धकांनी दुष्ट हेतूने हा प्रकार केला आहे.
- सुधीर उर्फ तात्या महाराज साळंुखे
दस्त लेखनिक