बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 09:58 IST2026-05-02T09:58:28+5:302026-05-02T09:58:48+5:30

Jabalpur Cruise Tragedy:  मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील बरगी जलाशयात क्रूझ बुडून झालेल्या एका भीषण अपघातात ९ जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेचे अनेक व्हिडीओ आता समोर येत आहेत.

Jabalpur Cruise Tragedy: What happened inside when the cruise ship started sinking? Where were the life jackets? Video of the Jabalpur accident out | बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही

बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही

 मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील बरगी जलाशयात क्रूझ बुडून झालेल्या एका भीषण अपघातात ९ जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेचे अनेक व्हिडीओ आता समोर येत आहेत. त्यामधून या अपघाताची भयावहता, हलगर्जी आणि आणि प्रवाशांच्या अखेरच्या क्षणाची हृदयद्रावक कहाणी समोर आणली आहे. जेव्हा अपघात होऊन क्रूझमध्ये पाणी भरू लागलं आणि बोट बुडायच्या स्थितीत आली तेव्हा प्रवाशांना लाईफ जॅकेट वाटण्यात आले. यादरम्यान, संपूर्ण क्रूझमध्ये गडबड, गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तसेच लोक आपले प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळत होते. तसेच पाणी झपाट्याने वाढत असल्याने सगळे जण एकमेकांना लाईफ जॅकेट देण्याचा प्रयत्न करत होते.

या व्हिडीओमध्ये आपल्या लहान मुलाला मिठीत कवटाळून मृत्यूमुखी पडलेल्या त्या दुर्दैवी मातेचे अखेरचे क्षणही चित्रित झाले आहेत. ही महिला तिच्या काळजाच्या तुकड्याला लाईफ जॅकेटच्या मदतीने अखेरपर्यंत वाचवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र दुर्दैवाने तिचे प्रयत्न अपुरे पडले. या मायलेकाचे मृतदेह एकमेकांना कवटाळलेल्या स्थितीत सापडले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्यांचे डोळे पाणावले. तसेच त्यांचा मृतावस्थेतला फोटो या दुर्घटनेचं हृदयद्रावक ओळख बनला. तसेच हा फोटो समोर येताच संपूर्ण देश हादरून गेला.

तर समोर आलेला दुसरा एक व्हिडीओ क्रूझला अपघात होण्यापूर्वी काही मिनिटे आधीचा आहे. यात प्रवासी जलपर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहेत. तसेच पुढच्या काही क्षणात मोठी दुर्घटना होऊ शकते हे त्यावेळी कुणाच्याही ध्यानीमनीही नव्हतं. मात्र त्यावेळी तेथील हवामान काहीसं प्रतिकूल असल्याचं आणि वेगाने वारे वाहत असल्याचंही व्हिडीओतून दिसत आहे. 

दरम्यान, दुर्घटना घडली तेव्हा अनेक प्रवाशांना सुरुवातीला लाईफ जॅकेट दिली गेली नव्हती असे तपासातून समोर आले आहे. जेव्हा क्रूझवरील परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली तेव्हा प्रवाशांना लाईफ जॅकेट देण्यात आली. त्यामुळे काही प्रवाशांचे प्राण वाचले. आतापर्यंत समोर आलेल्या व्हिडीओमधून दुर्घटनेचे अनेक पैलू समोर आले आहेत. पहिल्या व्हिडीओमधून बेफिकीरी आणि दुर्घटनेनंतर उडालेला गोंधळ दिसून आला आहे. दुसऱ्या व्हिडीओमध्ये परिस्थिती सामान्य असल्याने कुणालाही पुढे काय होणारा याची कुणाला कल्पना नसल्याचे दिसत आहे. तर तिसऱ्या व्हिडीओमधून दुर्घटनेमागची भयानक कारणं आणि बचाव मोहिमेतील आव्हाने दिसून आली आहे. .  
 

Web Title : जबलपुर नाव हादसा: नाव डूबने के दौरान अंदर का मंजर।

Web Summary : जबलपुर में एक क्रूज डूबने से नौ लोगों की मौत हो गई। वीडियो में नाव में पानी भरने से मची भगदड़, यात्रियों का जीवन रक्षक जैकेट के लिए संघर्ष और एक माँ की बच्चे को बचाने में मौत दिखाई गई है। शुरुआती फुटेज त्रासदी से पहले लापरवाह क्षणों को दर्शाता है, जो आपदा की भयावह वास्तविकता को उजागर करता है।

Web Title : Jabalpur Boat Tragedy: Inside the chaos as the boat sank.

Web Summary : A cruise ship sank in Jabalpur, killing nine. Videos reveal panic as the boat filled with water, passengers struggled for life jackets, and a mother died protecting her child. Initial footage shows carefree moments before tragedy struck, revealing the disaster's horrifying reality.