शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

देशात महिला सरन्यायाधीश हाेण्याची आली वेळ, सरन्यायाधीश शरद बाेबडे यांचे निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 06:48 IST

Sharad Bobde : न्यायपालिकेत पुरुषांच्या तुलनेत महिला न्यायाधीशांची संख्या कमी आहे. देशातील एकूण न्यायपालिकेत ही स्थिती दिसून येत आहे. याविराेधात महिला वकील संघटनेने याचिका दाखल केली.

नवी दिल्ली : देशात एक महिला सरन्यायाधीश हाेण्याची वेळ आली आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सरन्यायाधीश शरद बाेबडे यांनी नाेंदविले आहे. महिलांचे प्रतिनिधित्व वाढले पाहिजे, या मागणीसाठी सर्वाेच्च न्यायालय महिला वकिलांच्या संघटनेने याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी करताना न्या. बाेबडे यांनी हे वक्तव्य केले. 

न्यायपालिकेत पुरुषांच्या तुलनेत महिला न्यायाधीशांची संख्या कमी आहे. देशातील एकूण न्यायपालिकेत ही स्थिती दिसून येत आहे. याविराेधात महिला वकील संघटनेने याचिका दाखल केली. सर्वाेच्च न्यायालयातही महिला न्यायाधीशाची नियुक्ती व्हायला हवी. त्यासाठी पात्र महिला वकिलांचाही विचार झाला पाहिजे, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली. उच्च न्यायालयातही अधिक महिला न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. 

याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी सांगितले, घरगुती कारणे किंवा मुलांचे शिक्षण व इतर जबाबदाऱ्यांचे कारण सांगून अनेक महिलांनी न्यायाधीशपदी नियुक्त्या नाकारल्याचे विविध उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी यापूर्वी सांगितले आहे. सरन्यायाधीशांच्या निरीक्षणाला न्या. किशन काैल यांनीही समर्थन दिले.

जबाबदारी घेण्यास आनंद हाेईल-    सरन्यायाधीशांच्या निरीक्षणावर काही महिला वकिलांकडून आक्षेपही घेण्यात आला आहे. -    अनेक पुरुष वकील प्रॅक्टीस चांगली सुरू असल्यामुळे न्यायाधीशपदी नियुक्ती नाकारतात. त्यामुळे पुरुष न्यायाधीशांची संख्या कमी झाली का, असा सवाल मुंबईतील ॲड. वीणा गाैडा यांनी केला आहे. तर आम्ही तयार असून आणि ही जबाबदारी घेण्यास आनंद हाेईल, असे दिल्ली उच्च न्यायालय महिला वकील संघटनेने ट्वीट करून सरन्यायाधीशांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 

सर्वाेच्च न्यायालयात एकच महिला न्यायाधीश-    सध्या भारतात २५ उच्च न्यायालयांमध्ये ८१ महिला न्यायाधीश आणि १,०७८ पुरुष न्यायाधीश आहेत.-    तर सर्वाेच्च न्यायालयात केवळ एकच महिला न्यायाधीश असून २८ पुरुष न्यायाधीश आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय