शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 10:36 IST

भारतीय नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि जवळच्या संरक्षण शेल्टर्स अथवा निवारा केंद्राजवळच रहावे. तसेच, परिस्थिती सर्वसामान्य होईपर्यंत सावध रहावे आणि आवश्यकता भासल्यास तत्काळ दूतावासाशी संपर्क करावा, असे असेही भारतीय दुतावासाने म्हटले आहे.

इस्रायलने गुरुवारी रात्री उशिरा इराण विरोधात ऑपरेशन 'रायझिंग लायन' नावाने मोठी लष्करी कारवाई सुरू केली आहे. यानंतर, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढता तणाव बघता, भारत सरकारने तेथे राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. यात, "सध्याची प्रादेशिक परिस्थिती लक्षात घेता, सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे आणि इस्रायली अधिकाऱ्यांकडून आणि 'होम फ्रंट कमांड'कडून दिल्या जाणाऱ्या सुरक्षा विषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्णपणे पालन करावे," असे भारतीय दूतावासाने म्हटले आहे. 

याशिवाय, भारतीय नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि जवळच्या संरक्षण शेल्टर्स अथवा निवारा केंद्राजवळच रहावे. तसेच, परिस्थिती सर्वसामान्य होईपर्यंत सावध रहावे आणि आवश्यकता भासल्यास तत्काळ दूतावासाशी संपर्क करावा, असे असेही भारतीय दुतावासाने म्हटले आहे.

इस्रायलचे इराणवर ऑपरेशन 'रायझिंग लायन'इस्रायलने गुरुवारी रात्री उशिरा इराणविरुद्ध 'रायझिंग लायन'ची घोषणा केली. इराणच् माध्यमांनीही याची पुष्टी केली आहे. हा "पूर्व-प्रतिसाद" असल्याचे इस्रायली संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच, इराणचा अणुकार्यक्रम आपल्यासाठी धोकादायक होत, यामुचे ही लष्करी कारवाई आवश्यक होती, असे इस्रायलचे म्हणणे आहे.धोका पूर्णपणे संपेपर्यंत सुरूच राहणार ऑपरेशन -इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या कारवाईसंदर्भात मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, आपल्या सैन्याने इराणच्या अशा प्रमुख अणुशास्त्रज्ञांना लक्ष्य केले, जे कथितपणे अणुबॉम्ब विकस कार्यक्रमात लागले आहेत. याशिवाय, इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या मुख्य केंद्रावरही अचूक हल्ला करण्यात आल्याचेही ते म्हणाले. या कारवाईला इस्रायलने 'स्ट्रेंथ ऑफ अ लायन' असे नाव दिले आहे. जोवर इराणकडून निर्माण झालेला धोका पूर्णपणे नष्ट होत नाही, तोवर ही कारवाई सुरूच राहणार, असे नेत्यान्याहू यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणIndiaभारत