शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आयर्लंड विजयी

By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST

रोमहर्षक लढतीत आयर्लंड विजयी

रोमहर्षक लढतीत आयर्लंड विजयी
झिम्बाब्वेवर पाच धावांनी मात
होबर्ट : आयर्लंडने रोमहर्षक लढतीत शनिवारी झिम्बाब्वेला अवघ्या पाच धावांनी पराभूत करीत विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलच्या चढाओढीत स्वत:ला कायम राखले.
आयर्लंडने प्रथम फलंदाजी करीत विश्वचषकातील सवार्ेच्च ८ बाद ३३१ धावांची नोंद केली. एड जॉयसने ११२ आणि ॲण्डी बालबर्नी याने ९७ धावांचे योगदान दिले. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी १३६ धावांची भागीदारी केली. झिम्बाब्वेकडून कर्णधार ब्रँडन टेलर याने १२१ तसेच सीन विलियम्सने ९६ धावा ठोकल्या. पण पाच धावा कमी पडल्याने झिम्बाब्वे विजयापासून वंचित राहिला. आयर्लंडचा वेगवान गोलंदाज ॲलेक्स कुसाक याने अखेरच्या षटकात पहिल्या तीन चेंडूंवर दोन गडी बाद करीत झिम्बाब्वेला स्पर्धेबाहेर केले. आयर्लंडने चार सामन्यात तीन विजय आणि एका पराभवासह चौथे स्थान पटकावले. झिम्बाब्वेची एकवेळ ४ बाद ७४ अशी अवस्था झाली होती पण टेलर- विलियम्स यांनी पाचव्या गड्यासाठी १४९ धावा ठोकून सामन्यात चुरस आणली. टेलरला कुसाकने ३८ व्या षटकांत बाद केल्यानंतरही विलियम्सने एकाकी झुंज दिली. तो ४७ व्या षटकांत अखेरच्या चेंडूवर केविन ओब्रायनचा बळी ठरला. रेजिस चाकब्वा १७ आणि तवांडा मुपरिवा १८ यांनी आशा पल्लवित केल्या त्यावेळी अखेरच्या षटकांत सात धावांची गरज होती. कुसाकने पहिल्या चेंडूवर चाकब्वाची दांडी गुल केली. मुपरिवाचा झेल कर्णधार विलियम्स पोर्टरफिल्डने टिपताच झिम्बाब्वेची आशा संपली.
त्याआधी जॉयसच्या शतकामुळे आयर्लंडने सर्वाधिक धावा उभारल्या. बालबर्नी कर्णधार ब्रँडन टेलरच्या फेकीवर झेलबाद होताच शतकापासून वंचित राहिला. या संघाची सुरुवातही खराब झाली होती. पोर्टरफिल्ड २९, पॉल स्टर्लिंग १० हे लवकर बाद झाले. जॉयस - बालबर्नी यांनी तिसऱ्या गड्यासाठी १३८ धावा उभारून धावसंख्येला आकार दिला. जॉयसने १०३ चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकार खेचले. बालबर्नीने ७८ चेंडू टोलवित सात चौकार आणि चार षटकार मारले. गॅरी विल्सनने १३ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकारासह २५ धावांचे योगदान दिले. (वृत्तसंस्था)