शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

दबंग IPS अधिकारी शिवदीप लांडेंचा राजीनामा मंजूर; केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केली अधिसूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 18:35 IST

Shivdeep Lande: महाराष्ट्राचे सूपुत्र IPS शिवदीप लांडे यांच्या नावाने बिहारचे गुंड थरथर कापायचे.

IPS Shivdeep Lande:बिहारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दबंग पोलिस अधिकारी, अशी ओळख असलेले IPS शिवदीप लांडे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयजी शिवदीप लांडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. राष्ट्रपती भवनाने त्याची अधिसूचनाही जारी केली आहे. शिवदीप लांडे हे 2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून, 19 वर्षे देशाची सेवा केल्यानंतर त्यांनी आता राजीनामा दिला.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी पूर्णिया आयजी पदावर कार्यरत असताना पोलिस सेवेचा राजीनामा दिला होता. यासंबंधीचे पत्र पोलिस मुख्यालयाला पाठवण्यात आले होते, त्यानंतर अर्जावर विचार सुरू होता. त्यांचा राजीनामा मुख्य सचिवांमार्फत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आला, जिथे तो मंजूर करण्यात आला. राजीनाम्याची माहिती खुद्द शिवदीप लांडे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर दिली होती. मी भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) राजीनामा दिला आहे, पण मी बिहारमध्येच राहीन आणि भविष्यातही बिहार हेच माझे कार्यस्थान असेल, असे त्यांनी सांगितले होते.

राजीनामा का दिला?मूळ महाराष्ट्रातील असलेले, पण बिहारमध्ये सेवा देणारे सुप्रसिद्ध आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी राजीनामा दिला होता. दबंग पोलिस अधिकारी, अशी ओळख असलेल्या शिवदीप लांडेंनी अचानक राजीनामा दिल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. ते प्रशांत किशोर यांच्या पक्षातून राजकारणात एंट्री करणार असल्याची चर्चाही सुरू झाली होती. पण, वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे स्वतः लांडेंनी जाहीर केले. आता ते पुढे काय करणार, हे लवकरच कळेल.

 

 

टॅग्स :PoliceपोलिसBiharबिहार