शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
4
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
5
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
6
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
7
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
8
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
9
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
10
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
11
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
12
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
13
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
14
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
15
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
16
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
17
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
18
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
19
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
20
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंघोषित बाबा नित्यानंदविरोधात इंटरपोलची ब्ल्यू कॉर्नर नोटीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 20:26 IST

परराष्ट्र मंत्रालयाने नित्यानंदचा पासपोर्ट रद्द केल्यापासून तो फरार आहे.

अहमदाबाद : भारतातून फरार झालेला स्वयंघोषित बाबा नित्यानंद याच्याविरोधात आता इंटरपोलने नोटीस जारी केली आहे. गुजरात पोलिसांनी केलेल्या विनंतीवरून इंटरपोलने ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. गेल्या वर्षभरापासून नित्यानंद फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. 

नित्यानंद लहान मुलांचे अपहरण करून त्यांना अहमदाबाद येथील आश्रमात डांबून ठेवायचा आणि नंतर या मुलांना त्यांच्या अनुयायांसोबत दान गोळा करण्यासाठी पाठवायचा, असा त्याच्यावर आरोप आहे.  तसेच, त्याच्यावर कर्नाटकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परराष्ट्र मंत्रालयाने नित्यानंदचा पासपोर्ट रद्द केल्यापासून तो फरार आहे. त्यामुळे गुजरात पोलिसांनी इंटरपोलला त्याच्याविरूद्ध नोटीस जारी करण्याची विनंती केली होती.



 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी नित्यानंदने दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर या देशात एक बेट विकत घेऊन तिथे स्वतंत्र देश स्थापन केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, या देशाचे कैलासा असे नामकरण करण्यात असून हे हिंदू राष्ट्र असल्याचे जाहीर केले गेल्याचे म्हटले जात आहे.

ब्ल्यू कॉर्नर नोटीस का दिली जाते?
इंटरपोलकडून त्यांच्या सदस्य देशांच्या गुन्हेगारांविरोधात वेगवेगळ्या नोटीसा जारी केल्या जातात. त्यात रेड कॉर्नर, ब्ल्यू, ब्लॅक, पर्पल, ऑरेंज आणि यलो नोटीसांचाही समावेश आहे. गुन्हेगार किंवा हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात येते. याशिवाय, गुन्हेगाराला अटक करण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस बजावली जाते.  

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारी