"800 लोकांच्या जमावाचा हेतू हा जीवे मारण्याचा होता"; बंगालमधील हल्ल्यावर ED ने थेट सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 01:00 PM2024-01-06T13:00:08+5:302024-01-06T13:10:13+5:30

तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या समर्थकांनी ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती ईडीने दिली आहे.

intention of the mob of 800 people was to kill ed said on the attack in bengal | "800 लोकांच्या जमावाचा हेतू हा जीवे मारण्याचा होता"; बंगालमधील हल्ल्यावर ED ने थेट सांगितलं

फोटो - ndtv.in

तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या समर्थकांनी ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती ईडीने दिली आहे. ईडीने म्हटलं आहे की, जमावामध्ये 800 ते 1000 लोक होते आणि त्यांचा हेतू "जीवे मारण्याचा" होता. तीन अधिकारी गंभीर जखमी झाले आणि जमावातील लोकांनी मोबाईल, पाकीट आणि लॅपटॉपसह त्यांच्या कर्मचाऱ्यांचे सामान लुटलं असंही एजन्सीने सांगितलं. 

पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे शुक्रवारी ईडीच्या पथकावर हल्ला झाला. त्यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) सार्वजनिक वितरण घोटाळा प्रकरणामध्ये तृणमूल नेता शेख शाहजहांशी संबंधित परिसराची झडती घेत होते. 

तृणमूल काँग्रेसने या घटनेला "भाजपाचं षड्यंत्र" म्हटलं आहे आणि दावा केला आहे की केंद्रीय एजन्सीशी जोडलेल्या अनियंत्रित घटकांनी स्थानिक लोकांना भडकावलं, भाजपाने राज्यातील सत्ताधारी पक्षाचे सरकार राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचं म्हटलं आहे. 

ट्विटरवर पोस्ट केलेल्या निवेदनात ईडीने शेख यांना तृणमूल काँग्रेसचे संयोजक म्हटले आहे. सीआरपीएफच्या जवानांसह ईडीच्या पथकावर 800 ते 1000 लोकांनी त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कंपाऊंडमध्ये हल्ला केला. लोक काठ्या, दगड आणि विटा यांसारखी शस्त्रे घेऊन गेले होते.

या घटनेत ईडीचे तीन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी ईडी अधिकाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिंसक जमावाने ईडी अधिकाऱ्यांचे मोबाईल, लॅपटॉप, रोख रक्कम, पाकीट चोरले. ईडीच्या काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

एजन्सीने सांगितलं की, शेख यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला आणि जेव्हा टीमने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा अर्ध्या तासात जमाव जमा झाला. दगडफेक करण्यात आल्याचा आरोप आहे. जमाव खूपच हिंसक झाल्याने इतर अधिकाऱ्यांना त्यांचा जीव वाचवण्यासाठी शोध न घेता घटनास्थळावरून पळून जावे लागले. 

Web Title: intention of the mob of 800 people was to kill ed said on the attack in bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.