शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

सबसिडीत कपात करण्याऐवजी गळती रोखण्यावर भर

By admin | Updated: March 1, 2015 02:34 IST

वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात वित्तीत तूट नियंत्रित करण्यासाठी विविध क्षेत्रांना दिली जाणारी सबसिडी तर्कसंगत बनविण्यासोबतच त्यात लाक्षणिक कपात करण्यात आली आहे.

जयशंकर गुप्त - नवी दिल्लीवित्तमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात वित्तीत तूट नियंत्रित करण्यासाठी विविध क्षेत्रांना दिली जाणारी सबसिडी तर्कसंगत बनविण्यासोबतच त्यात लाक्षणिक कपात करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या (२०१४-१५) संशोधित अर्थसंकल्पात सकल राष्ट्रीय उत्पादनाचा २ टक्के भाग सबसिडीच्या खात्यात ठेवण्यात आला होता. परंतु २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात सबसिडीच्या खात्यात सकल राष्ट्रीय उत्पादनाचा १.६ टक्के भाग ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच सबसिडी समाप्त करण्याऐवजी त्यातील गळती रोखण्यावर भर देण्यात आला आहे.पेट्रोल आणि डिझेल आधीच नियंत्रणमुक्त करून सबसिडीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे. तसेच एलपीजीसाठी सुरू करण्यात आलेल्या नव्या योजनेअंतर्गत आधार कार्डधारक आणि आधार कार्ड नसलेल्यांना सबसिडीचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात स्थानांतरित करण्यात येत आहे. अशा प्रकारे सबसिडीतील गळती रोखण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. आता केरोसीन, खते आणि खाद्यान्नावर दिल्या जाणाऱ्या सबसिडीतील गळती कमी करण्यासाठी असाच प्रयत्न करण्यात येणार आहे.सबसिडीचा लाभ थेट तिचे लाभार्थी म्हणजे गरीब आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यावर भर देताना जेटली म्हणाले, ‘स्वयंपाकाचा गॅस सिलिंडरच्या (एलपीजी) ११.२ कोटी ग्राहकांना ६३३५ कोटी रुपयांची सबसिडी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या सभागृहाचे सदस्य असलेल्या खासदारांप्रमाणेच जादा कर भरणाऱ्यांच्या श्रेणीत मोडणारे श्रीमंत आणि गरिबांच्या कल्याणाची खरोखरच चिंता असलेले लोक स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर मिळणाऱ्या सबसिडीचा स्वेच्छेने त्याग करतील, अशी आशा आहे.’