शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'...ही भारतासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब', नारायणमूर्ती संतापले; नेमकं काय कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 14:27 IST

इनफोसिसचे संस्थापक नारायणमूर्ती यांनी भारतातील परिस्थितीवरुन खडे बोल सुनावले.

भारतीय कफ सिरप(सर्दीचे औषध)मुळे गांबियातील मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेवरुन इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायणमूर्ती यांनी मोठे विधान केले आहे. 'भारतात बनवलेल्या कफ सिरपमुळे 66 मुलांचा मृत्यू होणे, ही भारतासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. यामुळे भारतीय फार्मा रेग्युलेटरी एजन्सीची प्रतिमा मलीन झाली,' असे विधान नारायणमूर्ती यांनी केले आहे.

भारतासाठी लाजिरवाणी बाबसोमवारी इन्फोसिस पारितोषिक 2022 समारंभातील आपल्या भाषणादरम्यान नारायण मूर्ती यांनी कफ सिरपमुळे मुलांचा मृत्यू होण्यावर चिंता व्यक्त केली. या घटनेमुळे जगभरात भारताची लाज गेली. गेल्या 20 वर्षांत भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खूप प्रगती केली, परंतु आजही आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत, असे मत नारायणमूर्ती यांनी व्यक्त केले.

शिक्षणाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह भारतातील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करताना नारायण मूर्ती म्हणतात की, जागतिक क्रमवारी 2022 मध्ये एकाही भारतीय शैक्षणिक संस्थेचा समावेश नाही. लस निर्मितीसाठीही इतर विकसित देशांच्या तंत्रज्ञानावर किंवा संशोधनावर अवलंबून राहावे लागते. डेंग्यू आणि चिकुनगुनिया यांसारख्या आजारांवर आजही आपण लस शोधू शकलो नाही. या आजारांना आपण गेली 70 वर्षे झुंज देत आहोत,असंही ते म्हणाले.

यशाचे दोन मूलभूत मंत्रयावेळी नारायणमूर्ती यांनी यशाचे दोन मूलभूत मंत्र दिले. ते म्हणतात की, कोणताही शोध यशस्वी होण्यासाठी पैसा ही पहिली गरज नाही. असे असते तर पूर्व युरोपातील देश गणिताच्या क्षेत्रात यशस्वी झाले नसते. संशोधनातील यशासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रथम- आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण हे जगातील सध्याच्या समस्यांशी निगडीत असले पाहिजे. दुसरे- आपल्या संशोधकांनी वर्तमानातील समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे, जेणेकरून ते भविष्यातील सर्वात मोठ्या समस्या सोडवू शकतील.

WHO ने अलर्ट जारी केला होतावर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने 5 ऑक्टोबर 2022 रोजी एक अलर्ट जारी केला होता की, इंडियाज मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेडने बनवलेले खोकला आणि सर्दीचे सिरप मृत्यू किंवा गंभीर मूत्रपिंडाच्या आजारासाठी जबाबदार असू शकते. रिपोर्टनुसार, या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलचे प्रमाण जास्त होते. हे दोन घटक मानवाच्या आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. 

टॅग्स :Narayana Murthyनारायण मूर्तीInfosysइन्फोसिसHealthआरोग्यDeathमृत्यू