शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगपतीच्या मुलाने झाडली स्वत:वर गोळी

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

उद्योगपतीच्या मुलाने झाडली स्वत:वर गोळी

उद्योगपतीच्या मुलाने झाडली स्वत:वर गोळी
प्रकृती स्थिर : व्यसनमुक्ती केंद्रातील घटना
नागपूर : एमआयडीसीच्या मैत्री व्यसनमुक्ती केंद्रातील एका उद्योगपतीच्या मुलाने आपल्या कानपटावर रिव्हॉल्व्हर ठेवून गोळी झाडल्याची घटना गुरुवारी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास घडली. यामुळे व्यसनमुक्ती केंद्रात एकच खळबळ उडाली.
सौरभ सुरेश शर्मा रा. फ्रेंड्स कॉलनी असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. सौरभच्या वडिलांचा अमरावती मार्गावर उद्योग आहे. सौरभला दारूचे व्यसन होते. त्यामुळे तो अनेक दिवसांपासून अमरनगरच्या मैत्री व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत होता. सुरुवातीला सौरभला तेथे भरती करण्यात आले होते. काही काळानंतर तो उपचारासाठी ये-जा करीत होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी ७.४५ वाजता सौरभ मैत्री व्यसनमुक्ती केंद्रात आला. तेथे तो असामान्य वर्तणूक करीत होता. त्यावेळी मैत्री व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक पाध्ये तेथे उपस्थित होते. सौरभचे हावभाव पाहून त्यांना शंका आली. सौरभची समजूत घालण्यासाठी ते त्याच्याजवळ आले. त्याचवेळी सौरभने रिव्हॉल्व्हर काढून आपल्या कानपटावर ठेवली. अचानक हा प्रसंग पाहून पाध्ये घाबरले. त्यांनी त्यास रिव्हॉल्व्हर काढून आपल्याशी बोलण्यास सांगितले. याच दरम्यान सौरभने स्वत:वर गोळी झाडली. डोक्यात गोळी लागल्यानंतर तो खाली कोसळला. पाध्ये यांनी त्वरित एमआयडीसी पोलिसांना सूचना देऊन सौरभला वानाडोंगरीच्या लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पाटणकर घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत सौरभची प्रकृती सामान्य होती. सौरभ हा मजबूत बांध्याचा असून नशेमुळे तो नेहमी तणावग्रस्त राहात होता. घटनेची माहिती मिळताच सौरभचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले. एमआयडीसी पोलीस रात्री उशिरापर्यंत तपास करीत होते. (प्रतिनिधी)