सुरेश भटेवरा, नवी दिल्लीकाश्मीरमधील उरी येथे लष्कराच्या तळावर पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्यानंतर भारत- पाकिस्तान सीमेवरचा तणाव अनेक पटीने वाढला आहे. भारताने आपली संरक्षण सिध्दता मजबूत करण्यासाठी सारी ताकद पणाला लावली आहे. ७७८ किलोमीटरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात भारतीय सैन्य तैनात केले जात आहे. शस्त्रास्त्रे, दारूगोळा व इंधन इत्यादीची भरपूर रसदही रवाना करण्यात आली आहे. ही सारी तयारी युध्दसदृश स्थितीचा इशारा देणारी आहे. रविवारी आकाशवाणीवर ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलतांना पंतप्रधान मोदींनी ‘भारताचे सैन्यदल बोलत नाही, पराक्रम करून दाखवते’ असा सूचक इशाराही दिला आहे.उरी हल्ल्यानंतर उसळलेल्या संतापाच्या लाटेला शांत करण्यासाठी भारत आणि पाक हे दोन्ही देश खरोखर युध्दाला सामोरे जातील काय? याचे उत्तर नकारार्थी असले, तरी संरक्षण सिध्दतेत भारत पाकिस्तानपेक्षा अनेक पटीने पुढे आहे, या वास्तवाची जाणीव संरक्षण मंत्रालयाने करून दिली आहे.पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची जोरदार मागणी देशभर उमटली. कट्टर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या काही व्यक्ती व संघटनांनी तर यावरून युद्धज्वर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदी यांनी सरकारमधील आपले सहकारी आणि तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख यांच्याशी चर्चा करून उतावळी आक्रमकता दाखविण्याऐवजी मुत्सद्दी संयम राखून राजनैतिक मार्ग वापरून पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटे पाडण्याचा निर्णय घेतला. अनेकांना हे पटलेले नाही व सत्ताधारी रालोआमधील काही मित्रपक्षांनी हा कचखाऊपणा असल्याची टिकाही सुरु केली आहे. पण या प्रक्षोभक क्षणाला भारताने घेतलेला पवित्रा हा दुर्बलाचा पळपुटेपणा नाही तर बलवानाने केवळ बाहुबलाचा विचार न करता शांत डोक्याने राखलेला प्रगल्भ संयम आहे, याची प्रचिती संरक्षण मंत्रालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीवरून सहजपणे येऊ शकते.
भारताचा संयम मुत्सद्दी बलवानाचा!
By admin | Updated: September 26, 2016 00:47 IST
काश्मीरमधील उरी येथे लष्कराच्या तळावर पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्यानंतर भारत- पाकिस्तान सीमेवरचा तणाव अनेक पटीने वाढला आहे
भारताचा संयम मुत्सद्दी बलवानाचा!
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}