शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे यान बुधवारी मंगळाच्या कक्षेत

By admin | Updated: September 22, 2014 03:11 IST

४४० न्यूटन लिक्विड एपोजी मोटार (एलएएम) इंजिन गेल्या ३०० दिवसांपासून सुप्तावस्थेत आहे. त्याची किमान ४ सेकंदासाठी चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : येत्या २४ सप्टेंबर रोजी भारताच्या मंगळ यानाने लाल ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करण्यापूर्वी ‘इस्रो’ सोमवारी अतिशय महत्त्वपूर्ण अशा ‘चौथ्या पथ संशोधन कार्य’ आणि अंतराळ यानाच्या प्रमुख द्रवित इंजिनची प्रायोगिक चाचणी घेण्यासाठी सज्ज आहे.४४० न्यूटन लिक्विड एपोजी मोटार (एलएएम) इंजिन गेल्या ३०० दिवसांपासून सुप्तावस्थेत आहे. त्याची किमान ४ सेकंदासाठी चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी यशस्वी ठरली, तर मंगळ यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या यशस्वीतेबाबतचा इस्रोचा आत्मविश्वास अधिक वाढेल.‘आम्ही चौथ्या पथ संशोधन कार्य आणि प्रमुख द्रवित इंजिनच्या प्रायोगिक चाचणीसाठी तयार आहोत. त्यासाठी अंतराळ यानाला कमांड (निर्देश) देण्यात आले आहेत आणि त्याची तपासणीही पूर्ण करण्यात आली आहे,’ असे इस्रोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.ही घटना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण ३०० दिवसांपर्यंत निष्क्रिय पडून असलेल्या इंजिनला चाचणीसाठी पुन्हा सुरू केले जाणार आहे. एलएएम इंजिनची प्रायोगिक चाचणी ही एक परीक्षाच आहे. मंगळाची कक्षा भेदण्याच्या उद्देशाने या इंजिनला दीर्घकाळासाठी सक्रिय करावयाचे आहे, असे हा अधिकारी म्हणाला.या इंजिनची प्रायोगिक चाचणी ३.९६८ सेकंदांसाठी २.१४२ मीटर प्रति सेकंद वेगाने घेतली जाईल. त्यासाठी किमान ०.५६७ किलो इंधन खर्च होईल. मंगळ मिशन हे भारताचे पहिलेच आंतरग्रह मिशन आहे. हे मंगळ यान ५ नोव्हेंबर २०१३ रोजी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील पोलर सॅटेलाईट लाँच व्हिकलच्या (पीएसएलव्ही) मदतीने प्रक्षेपित करण्यात आले होते. हे मंगळ यान बुधवारी लाल ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. ६६ कोटी ६० लाख कि.मी.च्या आपल्या प्रवासादरम्यान हे मंगळ अंतराळ यान १ डिसेंबर २०१३ रोजी पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षेत्राच्या बाहेर पडले होते.दरम्यान, सोमवारची योजना अपयशी ठरली, तर आपली दुसरी योजना (बी प्लान) तयार आहे. याअंतर्गत आठ प्रक्षेपकांना दीर्घकाळासाठी सोडले जाईल. त्यासाठी जादा इंधन लागेल आणि यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करू शकेल, असे इस्रोने म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)