शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय मुलांना लहान वयातच स्क्रीनचे व्यसन; वाढताहेत शारीरिक आणि मानसिक समस्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 08:41 IST

दोन वर्षांखालील मुलांचा स्क्रीन टाईम सरासरी १.२ तास आहे. दोन वर्षांपर्यंतच्या मुलांनी पूर्णपणे स्क्रीन टाळावी, असे मार्गदर्शक तत्त्वात सांगितले आहे. 

नवी दिल्ली : अलीकडील एका अभ्यासानुसार, भारतातील पाच वर्षांखालील बालकांचा दररोजचा स्क्रीन टाईम सरासरी २.२ तास असल्याचे आढळून आले आहे. हा स्क्रीन टाईम सुरक्षित मर्यादेपेक्षा दुप्पट आहे. यामुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

‘क्युरस’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात एम्स, रायपूर येथील डॉ. आशिष खोब्रागडे आणि डॉ. एम. स्वाथी शेनॉय यांनी २,८५७ मुलांचा समावेश असलेल्या १० अभ्यासांच्या मेटा-विश्लेषणानंतर हे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. या अभ्यासानुसार, दोन वर्षांखालील मुलांचा स्क्रीन टाईम सरासरी १.२ तास आहे. दोन वर्षांपर्यंतच्या मुलांनी पूर्णपणे स्क्रीन टाळावी, असे मार्गदर्शक तत्त्वात सांगितले आहे. 

मूल रडले म्हणून मोबाइल देणे टाळा फेलिक्स हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. डी. के. गुप्ता यांनी सांगितले की, “सुमारे ६०-७०% मुले सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त वेळ स्क्रीनवर घालवत आहेत. त्यामुळे त्यांच्यात शारीरिक व वागणुकीसंबंधी समस्या दिसून येत आहेत.” त्यांनी पालकांनी जेवताना किंवा मुलं रडत असताना त्यांना मोबाइल देणे टाळावे असे आवाहन केले. नाही तर ही सवय हळूहळू व्यसनात बदलते. पालकांनी स्वतःचा स्क्रीन वापर कमी करावा. मुलांच्या वाढत्या स्क्रीन टाईममुळे भाषिक विकास, बौद्धिक क्षमता आणि सामाजिक कौशल्यांवर परिणाम होतो. तसेच स्थूलता, झोपेचे विकार आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात, असे आढळून आले आहे. 

उपाय काय?घरात टेक-फ्री झोन तयार करणे.स्क्रीन टाईमसाठी ठरावीक वयोमर्यादेनुसार नियम बनवणे.मुलांना बाह्य खेळ आणि प्रत्यक्ष सामाजिक संवादात सहभागी करणे.पालकांनी स्वतःच्या सवयी बदलणे, म्हणजेच स्क्रीनसंदर्भातील सकारात्मक उदाहरण देणे.